पुणे - शहरात आज (16 मे) दिवसभरात सर्वाधिक 202 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 11 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.
शहरात 149 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३२९५ वर गेली आहे. डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात २९५४ आणि ससूनमध्ये ३४१ रुग्ण उपचार घेत आहेत. आता पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १४१२ झाली आहे.
पुणे महापालिका हद्दीतील एकूण मृत्यू संख्या १८५ वर गेली आहे. आजपर्यंत एकूण डिस्चार्ज दिलेले रुग्ण १६९८ इतके झाले आहेत. तर आज १२०५ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.