ETV Bharat / city

CoronaVirus : पुण्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 164 नवे रुग्ण, 7 जणांचा बळी

पुण्यात आतापर्यंत या रोगामुळे 156 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 737 रुग्ण झाले असून मंगळवारी 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona virus
corona virus
author img

By

Published : May 13, 2020, 12:36 PM IST

पुणे - कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी या रोगामुळे आणखी 7 जणांचा बळी गेला असून, 164 नवीन रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आतापर्यंत या रोगामुळे 156 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 737 रुग्ण झाले असून मंगळवारी 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona virus
पुण्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 164 नवे रुग्ण, 7 जणांचा बळी

पुण्यातील 107 रुग्ण गंभीर असून यातील 25 जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ससूनमध्ये 3 रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण 60 ते 75 या वयोगटातील आहेत. 2 पुरुष आणि 1 महिलेचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. येरवड्यातील 72 वर्षीय आणि 64 वर्षीय पुरुषाचा तर, बिबवेवाडीतील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबेटीस, उच्चरक्तदाब, किडनी विकार व इतरही आजार होते.

ससूनमध्ये आतापर्यंत 93 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 95 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, नाना पेठेतील 57 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोड भागातील 75 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, हडपसर - माळवाडी भागातील 86 वर्षीय पुरुषाचा सिम्बयोसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी 5 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला. सर्वांचे वय 60, 70, 80 या वयोगटातील आहे. कोरोनाची भीती ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.