ETV Bharat / city

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील 160 अधिकारी, कर्मचारी कारागृहातच लॉकडाऊन - yerawada news

मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह लॉकडाऊन आहे.

yerawad prisom
yerawad prisom
author img

By

Published : Apr 20, 2020, 11:57 AM IST

पुणे - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहातही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील 160 अधिकारी कारागृहातच लॉकडाऊन झालेत.

येरवडा कारागृहातील जेलर उत्तम पवार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी लॉकडाऊन झाले आहेत. कोणताही अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या बाहेर जात नाही, आणि कोणीही कारागृहात येत नाही. येरवडा कारागृहात साडेपाच हजार कैदी आहेत. या कैद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. येथे अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी शिक्षा भोगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली.

येरवडा कारागृहासह राज्यातील पाच कारागृहे लॉकडाऊन झाले आहेत. वरिष्ठ आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन राहतील. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह लॉकडाऊन आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.