पणजी (गोवा) - पणजी शहरात बुधवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालून इतर वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला गोवा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या घटनेनंतर तरुणाच्या या कृत्यामुळे त्याच्या पत्नी व त्याच्या मैत्रिणीमध्ये जोरदार भांडणही सुरू झाले होते.
हेही वाचा - Vegetables: पालेभाज्यांचे दरही कडाडले; आवक कमी झाल्याचा झाला परिणाम
पुण्यातील हा युवक आपल्या मैत्रिणींसह गोवा फिरायला आला होता. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास दारू पिऊन पणजी शहरात गाडी चालवत असताना त्याने अनेक गाड्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. वेळीच ही बाब जवळच असणाऱ्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी या युवकाला गाडीसह ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा युवक आपल्या मैत्रिणीसह मद्यधुंद अवस्थेत गाडीवर फिरत होता. ही गोष्ट त्याच्या पत्नीच्या लक्षात येताच दोघींमध्ये जोरदार भांडण झाले. रात्री उशिरा गोवा पोलिसांनी या तरुणासह त्याच्या मैत्रिणीलाही ताब्यात घेतले.
हेही वाचा - Stock Market: शेअर बाजारात चढ-उतार सुरुच;सलग तिसऱ्या दिवशी घसरणीची शक्यता