ETV Bharat / city

Vishwajit Rane : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या विश्वजीत राणेंनी घेतली पुन्हा मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

गोव्याचे माजी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले होते. आज गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( Goa CM Pramod Sawant Oath ) उपस्थित संपन्न झाला. यावेळी विश्वजीत राणे यांनीही मंत्री पदाची शपथ ( Vishwajit Rane took oath as a Minister ) घेतली आहे.

Vishwajit Rane
विश्वजीत राणेंनी घेतली पुन्हा मंत्रीपदाची शपथ
author img

By

Published : Mar 28, 2022, 1:06 PM IST

Updated : Mar 28, 2022, 3:43 PM IST

पणजी - गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होते. तर गोवा विधानसभा निवडणुकीचे ( Goa Election Result 2022 ) 10 मार्च रोजी निकाल हाती आले होती. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वाळपई मतदारसंघातून आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे या पर्यें मतदारसंघातून विजयी ( Vishwajeet and his wife Divya Rane won ) हे झाल्या. आज गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली तर विश्वजीत राणे मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी मागील विधीमंडळात आरोग्यमंत्री म्हणून कोविड काळात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे आरोग्य खाते दिल्या जाते की दुसरे कोणते खाते दिल्या जाते हे पाहणे उत्त्सुकतेचे राहणार आहे.

विश्वजीत राजे शपथविधी

उडाळी होती खळबळ - विश्वजीत राणे यांनी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. राणे आणि प्रमोद सावंत यांच्यात बरेच दिवसांपासून शीतयुद्ध सुरुही होते. त्यामुळे भाजपाची अंतर्गत राजकिय बंडाळी चव्हाट्यावर आली होती. केंद्रीय निरिक्षक गोव्यात याल्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत बंडाळी समोर आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

विश्वजीत राणे यांच्याबद्दल - उत्तर गोव्यात मोडणाऱ्या सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदार संघाचे विश्वजीत राणे प्रतिनिधीत्व करतात. उत्तर गोव्यातील वाळपई विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड कायम आहे. राणे हे 2017 ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र अवघ्या महिनाभरात त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन आपल्या सत्तरी युवा मोर्चा तर्फे अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पून्हा विजय झाला व पुढे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले होते.

2019 ला मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले व विश्वजित राणे पुन्हा आरोग्यमंत्री झाले. तेव्हापासून राणे यांना मुख्यमंत्री पदाविषयी लालसा निर्माण झाली. त्यानंतर वेळोवेळी राणे आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यात अनेकवेळा अप्रत्यक्षपणे वादही उद्भवले आहेत. मात्र प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्यात आणि सावंतांत कोणताहा वाद नाही आहे.

विश्वजीत राणे यांच्या पत्नी बद्दल - दिव्या राणे यांची ही पहिलीच निवडणूक होती. दिव्या राणे यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपले सासरे प्रतापसिंह राणे यांना दिलेले आहे. सून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वाढत्या वयामुळे, कुटुंबाचा कोणताही दबाव नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रतापसिंह राणे यांनी म्हटले होते. राणे या मतदारसंघातून 11 वेळा आमदार झाले होते. ते कधीही पराभूत झाले नाहीत.

हेही वाचा - Goa CM Pramod Sawant : प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री; जाणून घ्या राजकीय प्रवास

Last Updated : Mar 28, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.