ETV Bharat / city

उपराष्ट्रपती गोवा दौऱ्यावर, पेडण्यातील शासकीय महाविद्यालयाचे करणार उद्घाटन - उपराष्ट्रपती गोवा दौऱ्यावर

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू काल गोव्यात दाखल झाले. आज गुरुवारी ते पेडण्यातील संत सोहिरोबनाथ महाविद्यालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Vice-President Venkaiah Naidu on wednesday in Goa
उपराष्ट्रपती गोवा दौऱ्यावर, पेडण्यातील शासकीय महाविद्यालयाचे करणार उद्घाटन
author img

By

Published : Oct 28, 2021, 6:26 AM IST

पणजी - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बुधवारी दुपारी गोव्यात दाखल झाले. राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपराष्ट्रपतीेचे स्वागत केले. त्यांनतर ते पणजीतील राजभवन येथे दाखल झाले. सुरक्षेच्या कारणांस्तव त्यांचे वास्तव्य राजभवन येथेच आहे.

पेडणे येथे शासकीय महाविद्यालयाचे उद्घाटन -

उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उत्तर गोव्यातील पेडणे येथील शासकीय कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी ते पेडण्यातील संत सोहिरोबनाथ शासकीय महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत सहभागी होणार आहेत.

ममता बॅनर्जी आणि राहुल गांधीचा शुक्रवारपासून गोवा दौरा -

तृणमुल काँग्रेसच्या नेत्या तथा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारपासून राज्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. ममता बॅनर्जी गुरुवारी संध्याकाळी तर राहुल गांधी शुक्रवारी सकाळी गोव्यात दाखल होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी चा हा दौरा फार महत्वपूर्ण मानला जातोय.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case : आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.