पणजी - गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी हे दर सरकारने नियंत्रणात ठेवावे. यासाठी पुरवठादारांना देण्यात येणाऱ्या सबसिडीमध्ये आवश्यकता भासल्यास थोडी वाढ करावी आणि 2018 च्या दराप्रमाणे भाजी उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज केली. पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार कामत बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि ट्युलियो डिसोझा आदी उपस्थीत होते.
कामत म्हणाले, विधानसभा अधिवेशनात गणेश चतुर्थी पूर्वी राज्यभरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बूजवण्याचे, एलईडी बल्ब प्रत्येक मतदारसंघात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने सभागृहात दिले होते. मात्र, अद्याप त्या वर काहीच कृती झालेली नाही. सभागृहात दिलेली वचने धुडकावत सरकार आपली असंवेदनशीलता दाखवून देत आहे. गोव्यातील मोठ्या सणांपैकी एक असलेला गणेश चतुर्थी असल्याने या काळात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे फलोत्पादन महामंडळाच्या माध्यमातून पुरवठा करताना सरकारने हे दर नियंत्रणात ठेवावेत. 2018 मधील गणेश चतुर्थी काळातील दरांप्रमाणे भाजी उपलब्ध करून द्यावी.
नुकताच उत्तर गोव्यातील काही गावांना पुराचा फटका बसला आहे. अशा शेतकऱ्यांना चतुर्थी काळासाठी अंतरिम दिलासा म्हणून तत्काळ थोडी तरी रोख रक्कम देण्यात यावी. अशी मागणी करत कामत म्हणाले, राज्यातील अनेक छोटे मोठे पूल आहेत. त्यांच्या बांधकामाची क्षमता चाचणी घ्यावी. आठवड्यापूर्वी राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्याला पाण्यासाठी आठ दिवस वाट पहावी लागली. या अनुषंगाने बोलताना कामत म्हणाले, पणजी शहरात आपत्तीकाळात वापरण्यासाठी पाणी साठवून ठेवण्याची सोय नाही. त्यामुळे सरकारने अशी यंत्रणा निर्माण करावी.

डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या भीतीदायक -
गोव्याच्या काही भागांत डेंग्यू रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर ती वाढण्याची शक्यता आहे. असे सांगून कामत म्हणाले, यासाठी आरोग्य विभागाने वेगाने पावले उचलावीत. ज्यामुळे रोगावर नियत्रण आणता येईल.