ETV Bharat / city

Goa Assembly Election : उत्पल पर्रीकरांच्या प्रचाराला सुरूवात; तर पार्सेकर आणि उत्पल समजावण्याच्या पलीकडचे - देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

उत्पल पर्रीकर यांनी आजपासून आपल्या मतदारसंघात घरोघरी प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल शिवाय पार्सेकर यांनी देखील वेगळी वाट धरली आहे. दोघांचेही मन वळवण्यात भाजपा नेतृत्वाला अपयश आल्याने उत्पल आणि पार्सेकर समजावण्याच्या पलीकडे असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Goa Assembly Election
Goa Assembly Election
author img

By

Published : Jan 29, 2022, 1:53 PM IST

पणजी - भाजपाने मला तिकीट नाकारले तरी मी अपक्ष निवडणूक लढून प्रत्येक पणजीकरांना भेटणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. त्यांनी आजपासून आपल्या मतदारसंघात घरोघरी प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल शिवाय पार्सेकर यांनी देखील वेगळी वाट धरली आहे. दोघांचेही मन वळवण्यात भाजपा नेतृत्वाला अपयश आल्याने उत्पल आणि पार्सेकर समजावण्याच्या पलीकडे असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

उत्पल पर्रीकरांच्या प्रचाराला सुरूवात

उत्पल पर्रीकर यांनी नुकताच पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला. आजपासून उत्पल यांनी पणजी मतदारसंघात घरोघरी जाऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल यांना मागच्या काही दिवसांपासून पणजीत विविध पक्ष व घटकांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली असून आपला गड राखण्याचे आव्हान आता भाजपसमोर उभे आहे.

  • I will try to meet each person in Panaji. The circumstances forced me to take this decision (of contesting an independent candidate) from Panaji. I want to give people a good option in candidates: Utpal Parrikar, son of former Goa CM late Manohar Parrikar #GoaElections2022 pic.twitter.com/DT9QWKcz95

    — ANI (@ANI) January 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माघारी आलेल्यांचे स्वागत करतो -

दरम्यान पणजीतून उत्पल आणि मांन्द्रे मतदारसंघातून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र 31 जानेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. याविषयी भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, पर्रीकर आणि पार्सेकर यांना आम्ही सर्व पर्याय दिले होते. तसेच पुढाकार घेऊन त्यांची समजूत काढली. पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आत्ता त्याने समजवण्याचा आम्ही प्रयत्न सोडून दिल्याचे ते म्हणाले. तरीसुद्धा त्यांना पुन्हा पक्षात माघारी यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे म्हणत भाजपाचे दरवाजे त्यांच्यासाठी अजूनही खुले असल्याचे संकेत त्यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.