पणजी - 2017 ला विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले. मात्र, भाजपला सत्ता स्थापन करून देण्यासाठी त्यांनी वेळ काढला. याचाच फायदा घेऊन 13 आमदार निवडून आलेल्या भाजपने अपक्ष, महाराष्ट्र गोमंतक पक्ष (Maharahstra Gomantak) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) च्या वतीने राज्यात सत्ता स्थापन केली. आणि केंद्रात संरक्षण मंत्री असणारे मनोहर पर्रीकर राज्यात पुन्हा परत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
2019 पर्यंत राज्यकारभार व्यवस्थित चालला होता आणि 17 मार्च 2019 ला मनोहर पर्रीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. आणि राज्याची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी पुन्हा हेच सगळे पक्ष एकत्र आले. आणि विधानसभेचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत यांनी भर मध्यरात्री मुख्यमंत्री म्हणून शप्पथ घेतली सोबत राज्याला नवे दोन उपमुख्यमंत्री मिळाले. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे सुदिन ढवळीकर.
राज्यातील मुख्य विरोधक
मात्र, सरदेसाई आणि ढवळीकर पुढे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना डोईजड व्हायला लागले. मात्र, 10 जुलैच्या रात्री काँग्रेस व मगोचे एकत्रित 13 आमदार फुटून भाजपला मिळाले. आणि 13 आमदार असणाऱ्या भाजपचे अपक्षसहित 27च्या संख्येने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. आणि त्यातूनच पुढे गोवा फॉरवर्ड आणि गोमंतकचे नेते बाजूला झाले त्यांची मंत्रीपदे गेली आणि ते भाजपचे राज्यातील मुख्य विरोधक झाले.
तृणमूलच्या नेत्यांचा आरोप
आत्ता गोवा फॉरवर्डने काँग्रेसशी युती केली. मात्र, काँग्रेसचे नेते प्रत्यक्षरित्या नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करत नाही. कारण 2019 चे डॉ. प्रमोद सावंत यांचे सावंतवाडी सरकार स्थापन करण्यात काँग्रेसने मदत केली असा आरोप तृणमूलने केला आहे. मात्र, काँग्रेसचे नेते भाजपा नेत्यांवर काहीही बोलत नसल्याची टीकाही त्यानी केली. तसेच 2007 ते 2012 पर्यंत मुख्यमंत्री असताना दिगंबर कामत यांनी राज्याचे प्रश्न अधांतरीच सोडून दिले. त्याचे वाईट परिणाम आजही भाजपा सरकारच्या काळात लोक भोगत असल्याचे तृणमूलचे नेते यतीश नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा - Goa Election : गोव्यात येणारे पक्ष हे परदेशी जातीचे पक्षी आहेत - देवेंद्र फडणवीस