ETV Bharat / city

गोव्यात 'ट्रॅफिक सेन्टीनल' योजना सुरू राहणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - अॅन्टिनियो फर्नांडिस

'ट्रॅफिक सेन्टीनल' योजनेत आतापर्यंत ७३८७ लोकांनी नोंदणी केली आहे. यासाठी १६५ विजेत्यांना ३७ लाख ८१ हजार रुपये बक्षीसासाठी खर्च करण्यात आले आहेत. तर, २९ लाख २७ हजारांची रक्कम १०१ जणांना देणे बाकी आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत
author img

By

Published : Jul 16, 2019, 5:33 PM IST

पणजी - गोव्यातील बहुचर्चित 'ट्रॅफिक सेन्टीनल' ( वाहतूक पहारेदारी) योजना सुरूच राहणार आहे. यासाठी सरकारने बक्षीस स्वरूपात आतापर्यंत 37 लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. तर, २९ लाखांहून अधिक रक्कम देणे बाकी आहे.

सांताक्रूझचे आमदार अॅन्टिनियो फर्नांडिस यांनी तारांकित प्रश्न काळात गोव्यातील ट्रॅफिक सेन्टीनलची सध्यस्थिती काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत उत्तर देतान म्हणाले, ही योजना कायम आहे. यासाठी आतापर्यंत ७३८७ लोकांनी नोंदणी केली आहे. यासाठी १६५ विजेत्यांना ३७ लाख ८१ हजार रुपये बक्षीसासाठी खर्च करण्यात आले आहेत. तर, २९ लाख २७ हजारांची रक्कम १०१ जणांना देणे बाकी आहे. परंतु, सर्वाधिक रक्कम कोणाला देण्यात आली, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सरकारला विकास योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता भासते. त्यामुळे सदर योजना बंद करावी, अशी मागणी केली.

तत्कालीन पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांच्या कल्पनेतून आकारास आलेल्या या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांकडून या माध्यमातून लोकांना त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे, ही योजना बंद करण्याची मागणी केली होती. तरीही जानेवारी २०१९ मधील अर्थसंकल्पिय अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनीही याचा विरोध केला होता. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी योजना सुरूच राहणार असे म्हटले होते. दरम्यान, डॉ. चंदर यांची बदली झाल्यानंतर याविषयीची चर्चा कमी झाली. त्यामुळे ही योजना बंद झाली असावी असा लोकांचा समज झाला होता. आता यावर राज्यभरातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

traffic sentinel
'ट्रॅफिक सेन्टीनल'

ट्रॅफिक सेन्टिनल योजना ही नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी सुरू करण्यात आली होती. योजनेत नागरिक वाहतुक नियमांचे उल्लघन केल्याचे फोटो किंवा चित्रफिती काढून पोलिसांना पाठवू शकतात. माहिती दिल्याबद्दल पोलीस नागरिकांना रिवार्ड प्वॉइंटस देतात. १०० पॉइंट्स झाल्यानंतर १ हजार रुपये बक्षिस म्हणून देण्यात येते. दर, ६ महिन्यातून होणाऱ्या लकी ड्रॉमधून विजेत्याला मोटारसायकल किंवा स्कूटी बंपर बक्षिस म्हणून देण्यात येते.

Intro:पणजी : गोव्यातील बहुचर्चित 'ट्रँफिक सेन्टीनल' ( वाहतूक पहारेदारी) योजना सुरूच राहणार आहे. यासाठी सरकारने बक्षीस स्वरूपात आतापर्यंत 37 लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. तर 29 लाखांहून अधिक रक्कम देणे बाकी आहे.

Body:सांताक्रूझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांनी तारांकित प्रश्न काळात गोव्यातील ट्रँफिक सेन्टीनलचे सध्यस्थिती काय आहे? असा सवाल उपस्थित केला होता.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ही योजना कायम आहे. यासाठी आतापर्यंत 7387 लोकांना नोंदणीकरत स्वत:ला जोडून घेतले आहे. यासाठी 165 विजेत्यांना 37 लाख 81 हजार रुपये बक्षीसासाठी खर्च करण्यात आली आहे. तर 29 लाख 27 हजारांची रक्कम 101 जणांना देणे बाकी आहे.
मात्र ,सर्वाधिक रक्कम कोणाला देण्यात आली. याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सरकारला विकास योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता भासते. त्यामुळे सदर योजना बंद करावी, अशी मागणी केली.
तत्कालीन पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांच्या कल्पनेतून आकारास आलेल्या या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्री यांच्या हस्ते 2017 च्या डिसेंबरमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांकडून या माध्यमातून लोकांना सतावले जात असल्याने बंद करण्याची मागणी केली होती. तरीही जानेवारी 2019 मधील अर्थसंकल्पिय अधिवेशनात यावर सभागृहात चर्चेसाठी आले असता सत्ताधारी आमदारांनीही याचा विरोध केला होता. परंतु, मुख्यमंत्री पर्रीकर आणि तत्कालीन वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सुरूच राहणार असे म्हटले होते.
दरम्यान, डॉ. चंदर यांची बदली झाल्यानंतर याविषयीची चर्चा कमी झाली. त्यामुळे ही योजना बंद झाली असावी असा लोकांचा समज झाला होता. आता यावर राज्यभरातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.