ETV Bharat / city

गोव्यातील पर्यटन व्यवसाय नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत; हॉटेल्स, वाहतूक साधनांच्या नोंदणीला मिळतोय प्रतिसाद - Tourism business in Goa

कोरोनाच्या महामारीमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. आता राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे गोव्यातील पर्यटन पुन्हा सुरू होणार आहे.

goa
गोव्यातील पर्यटन व्यवसाय नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत
author img

By

Published : Dec 22, 2020, 8:12 PM IST

पणजी - पर्यटन हा गोव्यातील प्रमुख उद्योगापैंकी एक आहे. कोरोनाच्या महामारीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.आता राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे गोव्यातील पर्यटन नव्याने उभारी घेण्यास सज्ज झाले आहे. पर्यटकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. देशातील पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसत आहेत.

गोव्यातील पर्यटन व्यवसाय नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत

कोविडनंतरच्या पर्यटन व्यवसायाविषयी बोलता गोवा ट्रँव्हल अँड टुरिझम असोसिएशन गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले, गोव्यात नोंदणीकृत 4100 हॉटेल्स आहेत. आतापर्यंत 1200 सुरू झाली आहेत. तर 47 हजार खोल्यापैकी 20 हजारही खोल्यांची मागणी झालेली नाही. चार्टरने येणारे पर्यटक मोठे आकर्षण असते. साधारणतः ऑक्टोबरमध्ये पहिले चार्टर येते त्यानंतर मार्चपर्यंत हंगाम सुरू राहतो. परंतु, कोविडमुळे तेही सुरू झालेले नाही. त्यामुळे छोट्या हॉटेल्स सुरू झालेली नाहीत. ऑगस्टमध्ये सरकारने हॉस्पिटँलिटी उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. तेव्हा केवळ 4 टक्के प्रतिसाद होता. सप्टेंबरमध्ये 14-15 टक्के, ऑक्टोबळमध्ये 30-35 टक्के, नोव्हेंबरमध्ये 50 टक्के लाभला. तर डिसेंबर हा पर्यटन हंगमातील महत्त्वाचा काळ असतो.

यावेळी 80-85 टक्के पर्यटक असतात. आता गोवा देशांतर्गत थेट विमानसेवेने जोडला आहे. 80 विमाने आहेत. परंतु, यामधील 50 सुरू झाली आहेत. कोविड महामारीचा परिणाम मोठा आहे. त्यामुळे हा व्यवसाय वाचविण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. सरकारच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. सरकारही पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी सकारात्मक आहे. तसेच गोवा हे उत्तम पर्यटन स्थळ असल्याने लवकर नुकसान भरून येईल, अशी आशा आहे. हा व्यवसाय सुरू झाला असला तरी कोविड संपलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालनही केले पाहिजे.

टुर्स कंपन्यांचे बुकिंग सुरू

पर्यटनाकरिता टुर्स ऑपरेटर्सना कसा प्रतिसाद लाभलोय याविषयी बोलताना केसरी टुर्सचे गोव्यातील प्रतिनिधी चारुदत्त राणे म्हणाले, देशांतर्गत सहलींसाठी जागा आरक्षण नोंदणी सुरू झाली आहे. ग्राहकांकडून चौकशी केली जात आहे. यामध्ये हनीमून कपल्स अधिक आहेत. तर 2021 मध्ये धार्मिक पर्यटन वाढण्याची शक्यता आहे. विदेशासाठी दुबई आणि मालदीव येथील सहली सुरू आहेत. आता, आमच्याकडे नोंदणी सुरू झाली आहे. लोक केवळ लस उपलब्ध होण्याची वाट पाहत आहेत. तर कोविडमुळे व्यवसाय कमी झाला. पण आता हळूहळू हॉटेलनां हळूहळू प्रतिसाद मिळत अआहे. नाताळ, नववर्ष पार्श्वभूमीवर नोंदणी सुरू झाली आहे. असे असले तरीही ग्राहकांनी सुरक्षित यावे आणि सुरक्षित जावे याची आम्ही काळजी घेत आहोत. पुनरागमन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.