पणजी - एका मासिकाचे ज्येष्ठ संपादक तरुण तेजपाल याच्यावर बलात्काराचा आरोप असून त्याची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयाने फेटाळून लावली. तर पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.
या प्रकरणाची सुनावणी सहा महिन्यात पूर्ण करावी, अशी मागणी तेजपालने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. ती फेटाळून लावत न्यायालयाने म्हापसा न्यायालयाला सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही सुनावणी आज म्हापसा न्यायालयात होणार होती. परंतु, तेथील न्यायाधीशांच्या बदलीमुळे पणजीतील जिल्हा आणि सत्र न्यायालयात घेण्यात आली.
आपल्याला वकील नियुक्ती करायचा आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबरनंतर सुनावणी घ्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, ती मागणी फेटाळून लावत न्यायालयाने 7 ऑक्टोबरला घेण्यात येईल, असे सांगितले.
नोव्हेंबर, 2013 मध्ये सहकारी महिला पत्रकार बलात्काराचा आरोप केल्यानंतर तेजपालला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत कधीच माध्यामांसमोर बोलला नव्हता. आज न्यायालयातून बाहेर पडताना तो म्हणाला की, प्रकरण न्यायप्रविष्ट असून सत्य समोर येईल.
काय आहे प्रकरण ?
2013 मध्ये पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले असता त्याने बलात्कार केल्याचा आरोप सहकारी महिला पत्रकाराने केला होता. सप्टेंबर, 2018 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. त्यानंतर तेजपालने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, त्याची याचिका न्यायालयाने तेथेही फेटाळली. अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्यानंतर तेजपालला 30 नोव्हेंबर, 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. तर मे, 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.