पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात सर्वाधिक टक्के मतदान झाले ( highest voting in CM Pramod Sawant constituency ) आहे. उत्तर गोव्यातील सांखलीम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदार संघात सर्वाधिक 89.61 टक्के मतदान झाले आहे, तर दक्षिण गोव्यातील बेनौलीम मतदारसंघात सर्वात कमी 70.20 टक्के मतदान ( lowest voter turnout at Benaulim ) झाले.
अटीतटीच्या सामन्यात मुख्यमंत्री विजयी -
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात सर्वाधिक टक्के मतदान झाले ( highest voting in CM Pramod Sawant constituency ) आहे. सांखलीम मतदार संघात एकूण 25666 मतदान झाले आहे. प्रमोद सांवत हे 666 मतांनी विजयी झाले आहेत. प्रमोद सावंत यांना 12250 एकूण मतदान पडलेले आहे. तर काँग्रेसचे धर्मेश सगलांनी यांना 11584 मते पडलेली आहे. या दोघांमध्ये अटीतटीचा सामना झाला.
बेनौलीममध्ये सर्वात कमी मतदान -
दक्षिण गोव्यातील बेनौलीम मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेले आहे. येथे आम आदमी पार्टीचे उमेदवार वेंझी व्हिएगास यांना 6411 तर तृणमूल काँग्रेसचे चर्चिल आलेमाओ यांना 5140 मतदान झालेले आहे. येथे एकूण मतदान हे 21114 ऐवढे झालेले आहे.
गोव्यातील अटीतटीचे सामने -
गोव्यात विविध मतदारसंघात अटीतटीचे सामने ( goa election 2022 ) झालेत. यामध्ये काही मतदारसंघात तर उमेदवार हे अवघ्या 76 आणि 77 मतांनी विजयी झाले आहेत. काट्यांची कट्टर झालेल्या मतदार संघामध्ये फोंडा आणि सेंट आंद्रे या हे आहेत. फोंडा मतदारसंघात सर्वात अटीतटीचा सामना हा महाराष्ट्रवादी गोमंतक आणि भाजपा उमेदवारात झाला आहे. येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार केतन प्रभू भाटीकर यांना 7437 तर भाजपाचे रवी नाईक यांना 7514 मते पडली आहेत. भाटीकर यांचावर भाजपाचे नाईक यांनी अवघ्या 77 मतांनी विजय मिळवला आहे. सेंट आंद्रे या मतदार संघाचा निकाल हा खूप रोमांचक पद्धतीने लागला आहे. विजयासाठी भाजपा उमेदवार आणि क्रांतीकारी गोवा पक्षाने देव पाण्यात ठेवले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या अटीतटीच्या सामन्यात भाजपाचे फ्रान्सिस्को सिल्वेरा यांचा क्रांतिकारी गोवा पक्षाचे वीरेश मुकेश बोरकर यांनी अवघ्या 76 मतांनी पराभव केला आहे. बोरकर यांना 5395 मते पडलेली आहेत.
गोव्यात ३ महिला उमेदवार विजयी -
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात 40 पैकी केेवळ 3 जागांवर महिला उमेदवारांना ( Women Candidates in Election ) यश मिळाले. गोवा निवडणुकित एकुन 301 उमेदवारांनी लढत दिली सर्वच पक्षांनी मिळुन केवळ 26 महिला ( 3 Women Candidates Won in Goa ) उमेदवारांना संधी दिली होती. या निवडुन आलेल्या तीघींच्याही पतींचे त्या त्या मतदार संघात चांगले वर्चस्व आहे. त्या आधारावरच त्यांना तिकीट मिळाल्याचे सांगण्यात येत होते. या तीघीही निवडुन आल्या आहेत तसेच त्यांचे पतीही निवडून आले आहेत.
हेही वाचा - Goa Election 2022 Result : गोव्यात भाजपचा विजय, काँग्रेसला जनतेने का नाकारले? पाहा सविस्तर विश्लेषण..