ETV Bharat / city

सुवर्णमहोत्सवी 'इफ्फी'साठी रशिया आंतरराष्ट्रीय भागिदारीस तयार- प्रकाश जावडेकर - russia

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट (इफ्फी) महोत्सव यावर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. यावेळी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट (इफ्फी) महोत्सव
author img

By

Published : Jul 14, 2019, 2:50 PM IST

पणजी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यावर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. यावेळी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तर महोत्सवात ऑस्कर वितरण पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, दिग्दर्शक मधुर भांडारकर उपस्थित होते.

पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात सुवर्णमहोत्सवी इफ्फी आयोजित केला जाणार आहे. यासाठी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच देशातील काही राज्ये सहभागी होणार आहेत. याकरिता देशातील 7 शहरांमध्ये रोडशो करत अधिकाधिक चित्रपट रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट (इफ्फी) महोत्सव

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये सुभाष देसाई, करण जोहर, सुभाष घई, सिद्धार्थ रॉय कपूर, राहुल रवैया, मधूर भांडारकर आदींचा समावेश आहे. सरकारने यासाठी तयारी केली आहे. मागील प्रतिसाद विचारात घेत अधिकाधिक चित्रपट रसिकांना चित्रपटांचा आस्वाद घेता यावा यासाठी काही खाजगी चित्रपटगृहात प्रदर्शन केले जाणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यावर आधारित प्रदर्शन आणि चित्रपट क्षेत्राशी निगडित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

यावेळी देण्यात येणाऱ्या बक्षिसांमध्ये उत्क्रृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर आणि 40 लाख रुपये तर उत्क्रृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि ज्युरी यांना रौप्य मयूर आणि 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.

कागदावर जरी केंद्र सरकार यजमान असले तरीही प्रत्यक्ष गोव्यालाच ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, जे चित्रपट रसिक येणार आहेत त्यांना दर्जेदार इफ्फी दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सुवर्णमहोत्सवी इफ्फी गोव्यात होत आहे, ही आमच्यासाठी सुवर्ण संधी आणि अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आदरातिथ्य देण्याचा गोवा सरकारच्या प्रयत्न राहणार आहे. हा महोत्सव सर्वांच्या आठवणीत रहावा, असा असेल तसेच एकाच शहरात महोत्सव होत असताना त्याच्याशी संबंधित एखादा कार्यक्रम राज्याच्या इतर भागात आयोजित केला जाणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

Intro:पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. यावेळी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तर महोत्सवात ऑस्कर वितरण पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, दिग्दर्शक मधुर भांडारकर उपस्थित होते. Body:पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेत जावडेकर यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात सुवर्णमहोत्सवी इफ्फी आयोजित केला जाणार आहे. यासाठी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच देशातील काही राज्ये सहभागी होणार आहेत. याकरिता देशातील 7 शहरांमध्ये रोडशो करत अधिकाधिक चित्रपट रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.ज्यामध्ये सुभाष देसाई, करण जोहर, सुभाष घई, सिद्धार्थ रॉय कपूर, राहुल रवैया, मधुर भांडारकर आदींचा समावेश आहे. सरकारने यासाठी तयारी केली आहे. मागील प्रतिसाद विचारात घेत अधिकाधिक चित्रपट रसिकांना चित्रपटांचा आस्वाद घेता यावा यासाठी काही खाजगी चित्रपटगृहात प्रदर्शन केले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यावर आधारित प्रदर्शन आणि चित्रपट क्षेत्राशी निगडित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. यावेळी फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजित राय फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
यावेळी देण्यात येणाऱ्या बक्षिसांमध्ये उत्क्रूष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर आणि 40 लाख रुपये तर उत्क्रुष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि ज्युरी यांना रौप्य मयूर आणि 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.
कागदावर जरी केंद्र सरकार यजमान असले तरीही प्रत्यक्ष गोव्यालाच ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, जे चित्रपट रसिक येणार आहेत त्यांना दर्जेदार इफ्फी दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
दर्जेदार सुविधा आणि आदरातिथ्य देणार : सावंत
सुवर्णमहोत्सवी इफ्फी गोव्यात होत आहे ही आमच्यासाठी सुवर्ण संधी आणि अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आदरातिथ्य देण्याचा गोवा सरकारच्या प्रयत्न राहणार आहे. हा महोत्सव सर्वांच्या आठवणीत रहावा असा असेल. तसेच एकाच शहरात महोत्सव होत असताना त्याच्याशी संबंधित एखादा कार्यक्रम राज्याच्या इतर भागात आयोजित केला जाणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, त्यानंतर आयोजन समितीने कला अकादमी, आयनॉक्स थिएटर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमची पाहणी केली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.