ETV Bharat / city

गोवा सुरक्षा मंचतर्फे सुभाष वेलिंगकर पोटनिवडणुकीच्या रिंगणात

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. गोवा सुरक्षा मंचातर्फे सुभाष वेलिंगकर रिंगणात उतरणार आहेत.

author img

By

Published : Apr 26, 2019, 8:56 PM IST

सुभाष वेलिंगकर पोटनिवडणूक रिंगणात

पणजी - गोवा सुरक्षा मंच पणजी विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून पक्षातर्फे सुभाष वेलिंगकर येथून निवडणूक लढवतील, अशी घोषणा पक्षनेते अरविंद भाटीकर यांनी आज पणजीत पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पक्षाध्यक्ष आत्माराम गांवकर, स्वाती केरकर, रोशन सामंत, गोविंद देव, किरण नायक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा गोसुमंने यापूर्वी केली होती. मात्र, उमेवाराचे नाव घोषित केले नव्हते.

गोव्यातील भाजप उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सुभाष वेलिंगकर यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. मात्र, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या माध्यामातून भाजप सरकारविरोधी केलेल्या भाषा आंदोलनामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी काही काळ वेगळा संघ स्थापन केला होता. तर 2017 च्या गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत गोसुमंने आपले उमेदवार उभे केल्यानंतर ते पक्षाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते. मात्र, डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला.

याच काळात मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. तेथील एखाद्या मतदारसंघातून वेलिंगकर निवडणूक लढवतील असे वाटत होते. परंतु, आज पणजी विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

वेलिंगकर यांच्या उमेदवारीमुळे पणजी विधानसभा पोटनिवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Intro:पणजी : गोवा सुरक्षा मंच पणजी पोटनिवडणूक लढविणार असून पक्षातर्फे सुभाष वेलिंगकर रिंगणात उतरणार आहेत, अशी घोषणा पक्षनेते अरवि भाटीकर यांनी आज पणजीत पत्रकार परिषदेत केली.

Body:यावेळी पक्षाध्यक्ष आत्माराम गांवकर, स्वाती केरकर, रोशन सामंत, गोविंद देव, किरण नायक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा गोसुमंने यापूर्वी केली होती. मात्र, उमेवाराचे नाव घोषित केले नव्हते.
गोव्यातील भाजप उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सुभाष वेलिंगकर यांच सहभाग राहिला आहे. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. मात्र, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या माध्यामातून भाजप सरकारविरोधी केलेल्या भाषा आंदोलनामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यामुळे त्यांना काही काळ वेगळा संघ स्थापन केला होता. तर 2017 च्या गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत गोसुमंने आपले उमेदवार उभे केल्यानंतर ते पक्षाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते. मात्र, डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. याच काळात मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. तेथील एखाद्या मतदारसंघातून वेलिंगकर निवडणूक लढवतील असे वाटत होते. परंतु, आज पणजी विधानसभेचे उमेदवार म्हणून निवड जाहीर झाली.
वेलिंगकर यांच्या उमेदवारीमुळे पणजी विधानसभा पोटनिवडूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
....
फोटो - gsmgoa26419 नावाने ईमेल करतो

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.