ETV Bharat / city

गोवा : पर्यटनासाठी सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार - पर्यटनमंत्री - goa tourism minister

राज्यात ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटनाचा नवा हंगाम सुरू झाला असून देशीविदेशी पर्यटकांना आत्तापासूनच गोव्यातील विविध फेस्टिव्हलचे वेध लागले आहेत. राज्यात दोन वर्षांपासून कोलमडलेल्या पर्यटनाला उभारी देण्यासाठी सरकारने नव्याने पुन्हा एकदा कृती आराखडा तयार केला आहे.

goa tourism
गोवा पर्यटन
author img

By

Published : Oct 5, 2021, 4:54 PM IST

Updated : Oct 5, 2021, 9:32 PM IST

पणजी (गोवा) - ऑक्टोबर महिना उजाडताच प्रत्येकाला गोव्यातील पर्यटनाचे वेध लागतात. या महिन्याच्या १ तारखेपासून पर्यटनाचा नवा हंगाम गोव्यात सुरू झाला आहे. त्यामुळेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पर्यटनासाठी आपला कृती आराखडा तयार झाल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली.

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर याबाबत बोलताना

राज्यात ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटनाचा नवा हंगाम सुरू झाला असून देशीविदेशी पर्यटकांना आत्तापासूनच गोव्यातील विविध फेस्टिव्हलचे वेध लागले आहेत. राज्यात दोन वर्षांपासून कोलमडलेल्या पर्यटनाला उभारी देण्यासाठी सरकारने नव्याने पुन्हा एकदा कृती आराखडा तयार केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम सरकारच्या वतीने राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नववर्ष स्वागत महोत्सव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्निवल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सव, गोव्याचा प्रसिद्ध शिमगोत्सव यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

पर्यटनाची घडी पुन्हा नव्याने बसविणार- पर्यटनमंत्री

राज्यात सध्या कोरोनाचे प्रमाण घटत असून दोन डोस घेणाऱ्या पर्यटकांचे व नागरिकांचे प्रमाण देशात व राज्यात अंतिम लक्षणीय आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होणार आहे. राज्यातील मंदिरे, समुद्रकिनारे, चर्च हीच गोव्याची खरी संपत्ती आहे. त्यातून निर्माण झालेल्या जगप्रसिद्ध गोव्याचे पर्यटन हे राज्याच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे पर्यटनाला नव्याने चालना देण्यासाठी सरकारचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली आहे.

ड्रग्ज घेणारे पर्यटक आम्हाला नकोत -

गोवा ही ड्रग्जची पंढरी मानली जाते. येथे अनेक देशी-विदेशी पर्यटक खुलेआमपणे अंमली पदार्थांचे सेवन करतात. अनेक रेव्ह पार्ट्याही गोव्यातील समुद्री भागात होत असतात. त्यामुळे गोव्याचे नाव देशासह जगाच्या नकाशावर उमटले जाते. त्यामुळे आगामी काळात हा ठसा पुसण्यासाठी कठोर अंमलबजावणी करून ड्रग्ज घेणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आल्याची माहितीही पर्यटनमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा - 7 ऑक्‍टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश

ओयो आणि रेंट ए होमवर विशेष नजर -

राज्यात सरकारच्या सर्व्हेनुसार २०१९साली अधिकृतपणे १ कोटी २५ लाख देशी व विदेशी पर्यटक दाखल झाले होते. त्यांची नोंद सरकारच्या पर्यटन विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, काही पर्यटक अनधिकृतपणे ओयो किंवा भाड्याची घरे घेऊन राहतात. त्यामुळे त्यांची नोंद सरकारदरबारी होत नाही, अशा अनधिकृतपणे राहणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.

तूर्तास ५ लाख व्हिसांना परवानगी -

राज्यात सध्या विविध देशांतून भागातून पर्यटक गोव्यात येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना ५ लाख व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात चार्टर्ड विमाने सुरू झाल्यानंतर हा आकडा ५० लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी डिसेंबर महिन्यात सुमारे १० लाखांहून अधिक पर्यटक दाखल होण्याची शक्यता सरकारने वर्तविली आहे. गेल्या वर्षी कोविड काळात हा आकडा ६ लाख पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात दाखल झाले होते.

राज्यात फिल्म शूटिंगला सुगीचे दिवस -

चित्रपट आणि गोवा हे वेगळेच समीकरण देशात आणि परदेशात दृढ झाले आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण गोव्यात झाले आहे. किंबहुना अनेक चित्रपटांनी गोव्याला एक वेगळी ओळखच निर्माण करून दिली आहे. ज्यात प्रामुख्याने अलीकडच्या काळातील सिंघम, सिंबा, गोलमाल अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या अनेक चित्रपटांचे पुढे सिक्वेल आले. अनेक दर्शकांनी या चित्रपटांना पसंदी दिली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गोव्याचे नावही या चित्रपटांमुळे देशाच्या, जगाच्या नकाशावर उमटले. मागच्या काही महिन्यांपासून बंद असलेले चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा नव्याने राज्यात सुरू झाले. राजधानी पणजीतील प्रसिद्ध अशा पणजी चर्च येथे धमाका दाखविणाऱ्या चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण रविवारी झाले. तेव्हापासून हा व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल होत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यात चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सुगीचे दिवस आले आहेत.

Last Updated : Oct 5, 2021, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.