पणजी - ऑगस्ट महिन्यात गोव्यात घडलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सुपूर्त करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले Goa CM Pramod Sawant आहे. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनी गोवा पोलीस आणि हरियाणा पोलीस यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले Question on Goa and Haryana Police Investigation होते. त्यामुळे फोगाट यांच्या कुटुंबीयांकडून हा तपास सीबीआय कडे सुपूर्त करावा अशी मागणी वाढत चालली होती. त्यालाच अनुसरून आता हा तपास सीबीआयकडे सुपूर्त होणार Sonali Phogat Death Case Now Handed Over To CBI आहे.
तीन जुन्या डायरी ताब्यात - गोव्यातून सोनाली फोगाट मृत्यूसाठी हरियाणा दाखल झालेल्या गोवा पोलिसांच्या पथकाला काही दिवसांपूर्वी सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. फोगाट यांच्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केलेल्या 3 डायऱ्या गोवा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातूनच पुढील तपासाची दिशा ठरणार Bjp Leader Sonali Phogat Murder Caseआहे. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील दिवंगत सोनाली फोगटच्या संत नगर येथील निवासस्थानी शुक्रवारी भेट दिलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने सांगितले की त्यांच्याकडे तीन जुन्या डायरी सापडल्या आहेत.
गोवा पोलिसांकडून सहकार्य नाही - सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात गोवा पोलीस आपल्याला सहकार्य करत नाहीत. या हत्याकांडात आरोपी असणाऱ्या व्यक्तींना गोवा पोलीस पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्याशी सहकार्याची भूमिका मागितल्यास ते आम्हाला सहकार्य करत नाही, असा दावा हरियाणाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.