ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात १५ टक्के मतांवर छोट्या पक्षांचा दावा - लहान पक्ष वोटशेअर गोवा विधानसभा निवडणूक 2022

गोव्यात सत्ताधारी पक्षाला सत्तेवर येण्यासाठी 30 टक्के मते पुरेशी असताना छोटे पक्ष मात्र सुमारे पंधरा टक्के मत मिळवताना दिसत आहेत. ( Small Parties Voteshare Goa Assembly Election 2022 ) छोट्या पक्षांच्या मतामुळेच काँग्रेस आणि भाजपसारख्या दिग्गज पक्षांना झुंजावे लागत आहे.

goa assembly election 2022
गोवा रणसंग्राम 2022
author img

By

Published : Jan 18, 2022, 10:31 PM IST

मुंबई - गोव्यात सत्ताधारी पक्षाला सत्तेवर येण्यासाठी 30 टक्के मते पुरेशी असताना छोटे पक्ष मात्र सुमारे पंधरा टक्के मत मिळवताना दिसत आहेत. ( Small Parties Voteshare Goa Assembly Election 2022 ) छोट्या पक्षांच्या मतामुळेच काँग्रेस आणि भाजपसारख्या दिग्गज पक्षांना झुंजावे लागत आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये नेहमीच लढत पाहायला मिळते. मात्र, आता आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनीही गोव्यात शिरकाव करण्याची तयारी सुरू केली आहे. वास्तविक महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ही यावेळी मैदानात उतरण्याची जोरदार तयारी चालवली आहे. एकूणच आतापर्यंत छोट्या पक्षांनी घेतलेल्या मतांमुळे मोठ्या पक्षांना झगडावे लागत होते.आता मोठ्या पक्षांची अधिक दमछाक होण्याची शक्यता आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी

गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला होता काँग्रेसने १७ जागा जिंकत २८.४ टक्के मते मिळवली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने १३ जागा जिंकत ३२.५ टक्के मते मिळवली होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते त्यांना ११.३ टक्के मते मिळाली होती. तर ३ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यांनीही सुमारे ११.१ टक्के मते मिळवली होती.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : काँग्रेस सामावून घेईना! शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने गोव्यात लढणार?

छोट्या पक्षांची कमाई -

गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच गोव्यात आम आदमी पार्टी रिंगणात उतरली होती. सर्व ४० जागा लढवणार या आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही मात्र त्यांनी ६:३ टक्के मते मिळवली. गोवा फॉरवर्ड पार्टीने केवळ चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तीन जागा त्यांना जिंकता आल्या. त्यांनी साडेतीन टक्के मते मिळवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १८ जागा लढवून एक जागा जिंकत २.३ टक्के मते मिळवली. गोवा सुरक्षा मंच यांनी १.२ टक्के, युनायटेड गोवन्स पार्टीने ०.९ टक्के गोवा सुराज्य पार्टीने आणि गोवा विकास पार्टीने प्रत्येकी ०.६ टक्के मते मिळवली.

एकूण मतांची टक्केवारी पाहिली तर छोट्या पक्षांनी सुमारे १५ टक्के मते मिळवली आहेत जी महाराष्ट्र गोमांतक पार्टी पेक्षा जास्त आहेत. या छोट्या पक्षांच्या मते खाण्यामुळे मोठ्या पक्षांच्या अनेक निकालांवर फरक पडू शकतो. यंदाही हे छोटे पक्ष मोठ्या पक्षांच्या विजयाच्या आड येणार हे नक्की. त्यातच यंदा तृणमूल काँग्रेस सारखा पश्चिम बंगालमधील नावाजलेला आणि शिवसेनेसारखा महाराष्ट्रातील मातब्बर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने मतांची विभागणी अधिक होणार यात शंका नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.