ETV Bharat / city

शिवराजसिंह चौहान यांनी गोव्यात येऊन केले अज्ञानाचे प्रदर्शन; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका - काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर

रविवारी भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान गोव्यात आले होते. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त होण्यास विलंब झाला, असा आरोप केला होता. चौहान यांच्या वक्तव्यांचा गोवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी समाचार घेतला.

शिवराजसिंह चौहान यांनी गोव्यात येऊन केले अज्ञानाचे प्रदर्शन; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:39 PM IST

पणजी - अहिंसेच्या मार्गाने युरोपियन देशांना समजावून पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व प्रयत्न केल्यानंतरच भारतीय सैन्य पाठवून गोवा मुक्त केला, हा इतिहास सर्वज्ञात आहे. असे असूनही भाजपनेते शिवराजसिंह चौहान यांनी आपले अज्ञान प्रदर्शित केले, अशी टीका गोवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज (मंगळवार) केली.

शिवराजसिंह चौहान यांनी गोव्यात येऊन केले अज्ञानाचे प्रदर्शन; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
रविवारी भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान गोव्यात आले होते. तेव्हा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त होण्यास विलंब झाला, असा आरोप केला होता.याचा समाचार घेताना चोडणकर म्हणाले, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेस यांच्यावर टीका करत आहे. जेव्हा गोव्याचा स्वातंत्र्य लढा सुरू होता, तेव्हा यांच्या संघटनांनी काय योगदान दिले, याचा अभ्यास करावा.पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य लढ्यात दहा वर्षे तुरुंगवास भोगला होता. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतले, याचा चौहान यांना अभ्यास करावा. संघाच्या नागपूर मुख्यालयात कधीपासून तिरंगा स्वीकारला? त्यासाठी का उशिरा झाला? हे सांगावे. यांचे देशप्रेम बेगडी आहे, असा आरोप ही चोडणकर यांनी यावेळी केला.Conclusion:

Intro:पणजी : अहिंसा तत्वाने युरोपियन देशांना समजावून पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्य पाठवून गोवा मुक्त केला हा इतिहास असूनही भाजपनेते शिवराजसिंह चौहान यांनी आपले अज्ञान प्रदर्शित केले, अशी टीका काँग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे केली.

Body:रविवारी भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान गोव्यात आले असता त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेस यांच्या चुकीच्या धोरणामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त होण्यास विलंब झाला, असा आरोप केला होता.
याचा समाचार घेताना चोडणकर म्हणाले, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेस यांच्यावर टीका करत आहेत. जेव्हा देवाचा स्वातंत्र्य लढा सुरू होता तेव्हा यांच्या संघटनी काय योगदान दिले, याचा अभ्यास करावा. पं. नेहरूंनी स्वातंत्र्य लढ्यात दहा वर्षे तुरुंगवास भोगला होता. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतले याचा विचार करत नसताना पं. नेहरूंना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत.हे इतिहासाचा अभ्यास करत नाहीत. तर इतिहासच बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.
असं असलं तरीही यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले असते तर स्वातंत्र्य लवकर मिळाले असते. ते फितूर होते, असे कधीच काँग्रेसने म्हटले नाही, असे सांगून चोडणकर म्हणाले, संघाच्या नागपूर मुख्यालयात कधीपासून तिरंगा स्वीकारला?तो का उशिरा झाला ? हे सांगावे. यांचे देशप्रेम बेगडी आहे, असा आरोप ही चोडणकर यांनी यावेळी केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.