पणजी -देशभरात नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठी संधी आहे. संबंधित राज्य सरकार आणि याच्याशी निगडित सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या क्षमता तपासून कशाप्रकारे विकसित करता येतील याचा विचार करावा. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला असल्याने एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. सरकारी धोरणही सकारात्मक आहे, असे केंद्रीय पर्यटन खात्याच्या अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार म्हणाल्या.
गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून 'अतुल्य भारत' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने पणजीत रोडशो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गोव्याचे पर्यटन सचिव जे. अशोक कुमार, ट्रँव्हल अँड टुरिझम असोसिएशन गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मिनिनो डिसोझा, इंडिया टुरिझमचे डी. व्यंकटेशन आदी उपस्थित होते.