पणजी - कोरोनाच्या ओमीक्रोन या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आर्टिपीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून या व्हेरिएंटचा प्रभाव असणाऱ्या 12 देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस सक्तीचे क्वारांटाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ओमीक्रोनला रोखण्यासाठी सरकारने एक तातडीची आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे याच्यासह प्रशासकीय व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ओमीक्रोनचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आर्टिपीसर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच ओमीक्रोन चा प्रभाव अधिक असणाऱ्या 12 देशांतून भारतात व विशेषतः गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस सक्तीचे क्वारांटाइन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर सरकार विशेष लक्ष ठेवणार असून विमान व बोटीतून गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची नोंद व तपासणी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ व मुरंगाव बंदरावर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.