पणजी - गोव्याची राजधानी पणजी महापालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची निवड झाली आहे. आज (दि. 30 मार्च) शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारला.
महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये पणजीचे भाजपचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या गटाने 30 पैकी 25 जागांवर विजय मिळविला. महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानंतर काल (दि. 29 मार्च) उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मोन्सेरात यांचे चिरंजीव रोहित यांची महापौर म्हणून निवड करण्यात आली. तर वसंत आगशीकर यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीनंतर आज रोहित मोन्सेरात यांनी पदभार स्वीकारला.
महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी नवे महापौर रोहित यांचे स्वागत केले. जेनिफर या रोहित यांच्या मातोश्री तर आमदार बाबुश हे वडील आहेत.
हेही वाचा - सरकारने मागील अंदाजपत्रकाचा आढावा ठेवणे आवश्यक- दिगंबर कामत