ETV Bharat / city

गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी सोहळ्यासाठी राष्ट्रपती कोविंद आज गोव्यात - state's 60th Liberation Day

गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवाचे (साठावे वर्षे) शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इतिहासात प्रथमच मुक्तीदिनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. राज्य सरकारने राष्ट्रपती कोविंद यांच्या आगमनाची तसेच उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे.

president ramnath kovind
राष्ट्रपती कोविंद आज गोव्यात
author img

By

Published : Dec 19, 2020, 10:14 AM IST

Updated : Dec 19, 2020, 10:28 AM IST

पणजी - गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षांनिमित्त राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गोव्याचा इतिहास जनतेसमोर मांडण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाने आज होणार आहे.

दुपारी राष्ट्रपतींचे आगमन

आज दुपारी राष्ट्रपतींचे दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने गोवा विद्यापीठ येथील हेलिपॅड येथे उतरून राजभवनात जातील. त्यानंतर संध्याकाळी पणजी शहरातील आझाद मैदानावरील शहीद स्मारकांवर पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर मुख्य सोहळ्यात सहभागी होतील. गोमंतकियांशी संवाद साधतील.

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

मुक्तीदिन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून गोमंतकाचा इ​तिहास आणि संस्कृती जगभर पोहोचविण्याचे नियोजन सरकारने केले आहे. त्यासाठी दहा मिनिटांची डॉक्युमेंटरी सादर करण्यात येणार असून, सुमारे १५० स्थानिक कलाकारांचा ‘गोंयचो गाज’ हा कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. खुद्द राष्ट्रपती कोविंद या कार्यक्रमाचा ४५ मिनिटे आस्वाद घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी (रविवारी) राष्ट्रपती आपल्या कुटुंबियांसमवेत खासगी भेटी देतील आणि संध्याकाळी दिल्लीकरीता रवाना होतील.

पणजीतील आझाद मैदान
पणजीतील आझाद मैदान

आकर्षक रोषणाई, चोख बंदोबस्त

राष्ट्रपतींचे आगमन आणि गोवा मुक्ती यामुळे राजधानी पणजीसह राज्यभरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच स्वागत आणि शुभेच्छा यांचे सरकारतर्फे फलक लावण्यात आले आहेत. तसेच सर्वत्र विद्युर रोषणाई करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 19, 2020, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.