पणजी - यावर्षीचा शेवटचा उत्सव म्हणजेच नाताळ सणासाठी अवघा गोवा सज्ज झाला आहे. घरे, चर्च यांना रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी नागरिक या सणातील मुख्य आकर्षण असलेला 'गोठा' बनविण्यात व्यस्त असलेले दिसत होते.
नाताळ सणासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झालेली आहे. जुने गोव्यातील सेंट झेवियर फ्रान्सिस फेस्तने गोव्यातील ख्रिस्ती समाजाच्या सणांना प्रारंभ होत असतो. त्यानंतर गावोगावी फेस्त साजरी केली जात असतात. मात्र, नाताळसण घरोघरी साजरा केला जात असल्याने जशी घरांची सजावट केली जाते. तशाच प्रकारे गावोवावच्या छोट्यामोठ्या चर्चना रंगरंगोटी करण्यात येते. तसेच, विद्युत रोषणाईने ती उधळून टाकली जातात. सोबतच गोठ्यातील ख्रिस्त जन्म देखावा तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. आकर्षक गोठे तयार केले जातात.
मंगळवारी मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेने नाताळ साजरा केला जाणार असल्याने आज(सोमवार) घरे आणि चर्चना रोषणाई केली जात होती.
हेही वाचा - गो एअरची देशातील १८ विमान उड्डाणे रद्द; प्रवाशांना मन:स्ताप
हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करा, आसाम वाचावा; आसाम सोसायटी ऑफ गोवा'ची निदर्शने