ETV Bharat / city

Prasad Gaonkar : 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करणारे कोण आहेत प्रसाद गावकर - गोवा विधानसभा निवडणूक अपडेट

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 10 मार्चला म्हणजे उद्या निकाल लागणार आहे. 40 जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत 301 उमेदवारांचे भवितव्य ठरणार ( Goa Assembly Election Result 2022 ) आहे. या निवडणुकीत प्रसाद गावकर हे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. या लेखात आपण त्याच्याच कारकीर्दीचा आढावा घेऊया.

Prasad Gaonkar
प्रसाद गावकर
author img

By

Published : Mar 9, 2022, 3:40 PM IST

पणजी - सध्या गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 10 मार्चला म्हणजे उद्या निकाल लागणार आहे. 40 जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत 301 उमेदवारांचे भवितव्य ठरणार ( Goa Assembly Election Result 2022 ) आहे. या निवडणुकीत प्रसाद गावकर हे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. या लेखात आपण त्याच्याच कारकीर्दीचा आढावा घेऊया.

प्रसाद गावकर हे भारतीय राजकारणी आहेत. ते 2017 गोवा विधानसभेच्या निवडणुकीत संगुएम येथून अपक्ष आमदार म्हणून गोवा विधानसभेवर निवडून आले होते. 2017 मध्ये त्यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आणि ते गोवा वन विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. मागची 5 वर्ष अपक्ष म्हणून राहिल्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांचा वावर वाढला होता. मात्र त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात ( Prasad Gaonkar join Congress ) प्रवेश केला. आपण मूळचे काँग्रेस कार्यकर्ते असून, मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट न मिळाल्यामुळे आपण अपक्ष निवडणूक लढलो, मात्र आज पुन्हा माघारी घरी परतल्याचे प्रसाद गावकर यांनी सांगितले होते.

Prasad Shashikant Gaonkar is a INC candidate from Sanguem constituency in the 2022 Goa Assembly elections
प्रसाद गावकर काँग्रेसकडून मैदानात

2017 च्या विधानसभा निवडणुकीत गावकर यांनी फल देसाई (भाजपा) आणि सावत्री कवळेकर (काँग्रेस) या दोघांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर, गांवकर यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. परंतु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सोबत मतभेद झाल्यानंतर तो मागे घेतला. नंतर त्यांनी अपक्ष म्हणूनच कारभार पाहिला.

गोवा विधानसभा निवडणूक -

गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी 40 जागांसाठी मतदान झाले आहे. विधानसभेचा कार्यकाळ हा 15 मार्चला संपत आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भापजाला यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय.

त्रिशंकू -

प्रादेशिक पक्षांच्या दमदार कामगिरीमुळे गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद आहेत. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली. आता यंदा कोणाची सत्ता येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Goa Election Results 2022 : निकालापूर्वीच काँग्रेस उमेदवार 'सेफ झोनमध्ये'; संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.