ETV Bharat / city

काँग्रेस मध्यमवर्गाचा अपमान करत आहे - पंतप्रधान मोदी - मनोहर पर्रिकर

भाजपने सत्तेवर आल्यानंतर गरीबी हटविली. त्यामुळे नवमध्यमवर्ग तयार झाला.

गोव्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Apr 10, 2019, 10:55 PM IST

पणजी - भाजपने सत्तेवर आल्यानंतर गरीबी हटविली. त्यामुळे नवमध्यमवर्ग तयार झाला. मात्र, काँग्रेस या मध्यवर्गाचा अपमान करत असून, तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील जाहीर सभेत केला. खाण बंदीमुळे निर्माण झालेल्या संकटाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून दिल्ली सरकार गोव्यासाठी आवश्यक तरतूद करणार आहे, असे आश्वासनही मोदींनी यावेळी दिले.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर, उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्यासह अनेकमंत्री आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

गोव्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या वडिलांवर असलेला ' बोफोर्स' प्रकरणाचा भ्रष्टाचाराचा डाग धूवून काढण्यासाठी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार खोटे बोलत आहेत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद तर मिळवले. मात्र, १२५ कोटीं लोकांचा विश्वास कसा प्राप्त करणार. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. हे गोव्याला चांगलेच ठाऊक आहे. कारण पर्रिकर मृत्यूशी झगडत असताना राजभवनात जाऊन संधीचा फायदा उठवत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होता. काँग्रेसकडे गोवा अथवा देशाच्या संस्कृतीचा कोणताच भाग नाही. यांचे हात नेहमी दोन कामात गुंतलेले असते एक म्हणजे सरकारी खजिना लुटणे आणि दुसरे म्हणजे रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवणे आहे. असा आरोप मोदी यांनी बोलताना केला.

मागील पाच वर्षात केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या पर्यटन विषयक निर्णयाचा गोव्याला लाभ मिळत आहे. पर्यटकांची संख्या वाढत आहे. गोव्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही वेगाने काम करत आहेत. केंद्राने महागाई नियंत्रणात आणली त्यामुळे लोकांची बचत वाढल्याने लोक पर्यटनावर खर्च करू लागले आहेत. असेही मोदी म्हणाले.

गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांची स्थिती काय झाली याची मला कल्पना आहे. तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसरकार बरोबरच सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडून गोव्यासाठी दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारची कसर न सोडता खाण व्यवसायासमोरील अडथळे दूर करणार असल्याचेही मोदी म्हणाले.

नील क्रांतीच्या माध्यमातून मच्छिमार विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. ज्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड प्रमाणेच मच्छिमारांना क्रेडिट कार्ड दिले जाईल. खाओल समुद्रातील मच्छिमारी सुखकर व्हावी यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे वाऱ्याचा वेग समजतोच मात्र, मासळी कुठे मिळू शकते, हेही समजणार आहे. गोव्याशी माझे भावनिक नाते आहे. येथे अनेकदा आलो. मात्र, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्यामध्ये नसतात पहिल्यांदा येत आहे. असे सांगून त्यांनी पर्रिकर यांची आठवण काढली.

'सबका साथ सबका विकास' कसा असतो हे पर्रीकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर जाण्यासाठी आम्ही काहीच कमी पडू देणार नाही, असेही मोदी म्हणाले. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली होती. तसाच शेवटी घोषणाही कोकणीतून देत भाषणाचा शेवट केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत, श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी विचार मांडले. यावेळी स्टेडियमबाहेर मंडप घालून स्क्रिन लावण्यात आली होती. सुमारे ३० हजार लोक या सभेसाठी उपस्थित होते.

Intro:पणजी : भाजपने सत्तेवर आल्यानंतर गरीबी हटविली. त्यामुळे नवमध्यमवर्ग तयार झाला. परंतु, काँग्रेस या मध्यवर्गाचा अपमान करत असून तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी आज गोव्यातील जाहीर सभेत केला. खाणबंदीमुळे निर्माण झालेल्या संकटाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून दिल्ली सरकार गोव्यासाठी आवश्यक तरतूद करणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Body:लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर, उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्यासह अनेकमंत्री आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, आपल्या वडिलांवर असलेला ' बोफोर्स' प्रकरणाचा भ्रष्टाचाराचा डाग धूवून काढण्यासाठी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार खोटे बोलत आहेत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद तर मिळवले. परंतु, १२५ कोटींलोकांचा विश्वास कसा प्राप्त करणार. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते.हे गोव्यापेक्षा अधिक चांगले कोण जाणू शकेल. कारण पर्रीकर म्रुत्युशी इगडत असताना राजभवनात जाऊन संधीचा फायदा उठवत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेसकडे गोवा अथवा देशाच्या संस्कृतीचा कोणताच भाग नाही. यांचे हात नेहमी दोन कामात गुंतलेले असते एक म्हणजे सरकारी खजिना लुटणे आणि दुसरे म्हणजे रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवणे.
मागील पाच वर्षात केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या पर्यटन विषयक निर्णयाचा गोव्याला लाभ मिळत आहे. पर्यटकांची संख्या वाढत आहे. गोव्याचा विकास व्हावा याकरिता आम्ही वेगाने काम करत आहेत. केंद्राने महागाई नियंत्रणात आणली त्यामुळे लोकांची बचत वाढल्याने लोक टर्यटनावर खर्च करू लागले आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांची स्थिती काय झाली याची मला कल्पना आहे. तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसरकार बरोबरच सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडून गोव्यासाठी दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारची कसर न सोडता खाण व्यवसायासमोरील अडथळे दूर करणार.
मोदी म्हणाले, नील क्रांतीच्या माध्यमातून मच्छीमार विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. ज्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड प्रमाणेच मच्छीमारांना क्रेडिट कार्ड दिले जाईल. खाओल समुद्रातील मच्छीमारी सुखकर व्हावी यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे वाऱ्याचा वेग समजतोच परंतु, मासळी कुठे मिळू शकते हेही समजणार आहे.
गोव्याशी माझे भावनिक नाते आहे. येथे अनेकदा आलो. परंतु, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्यामध्ये नसतात पहिल्यांदा येत आहे. ' सबका साथ सबका विका' कसा असतो हे पर्रीकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर जाण्यासाठी आम्ही काहीच कमी पडू देणार नाही, असेही मोदी म्हणाले.
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली होती. तसाच शेवटी घोषणाही कोकणीतून देत भाषणाचा शेवट केला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत, श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी विचार मांडले.
यावेळी स्टेडियमबाहेर मंडप घालून स्क्रीन लावण्यात आली होती. सुमारे तीस हजार लोक या सभेसाठी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.