गोवा - उत्पल पर्रीकर (Rupali Parivar) आणि लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासोबत दीपक पाऊसकर व ईझींतोर फर्नांडिझ यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्रीकर, पार्सेकर, पाऊसकर आणि फर्नांडिझ यांची पक्षाला सोडचिठ्ठी
उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासोबत दीपक पाऊसकर व ईझींतोर फर्नांडिझ यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर याना भाजपने तिकीट नाकारले त्यामुळे या दोघांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही इच्छुक उमेदवार यांना तिकीट नाकारण्याचे कारण म्हणजे भाजपने पणजीतून बाबुश मोंसरात आणि माद्रे तुन दयानंद सोपटे यांना तिकीट देताना ते तेथील स्थानिक आमदार असल्याच्या निकषांवर तिकीट देण्यात आल्याचे सांगण्यात आले..
पावसकर आणि फर्नांडिझ यांच्याबाबत विजयाची अपेक्षा कमी
दीपक पाऊसकर आणि ईझींदोर फर्नांडिझ हे 2019 चे आयात उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या बाबतीत भाजपला शक्यता कमी आहे, त्यामुळे भाजपने त्यांचा पत्ता कट केला.
पाटनेकर निवडणूक लढविणार
भाजपने बिचोली मतदारसंघात अद्याप उमेदवार घोषित केला नहोता, मात्र ही जागा उत्पल पर्रीकर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र पर्रीकर यांनी पणजीच्या जागेसाठी हट्ट धरला होता, मात्र भाजपने इथून बाबुश मोंसरात यांना तिकीट जाहीर केले. त्यामुळे पर्रीकर यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या बिचोलीम मतदारसंगातून विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर निवडणूक लढविणार आहेत. तशी घोषणा शनिवारी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केली आहे.
Goa Assembly Election : पर्रीकर, पार्सेकर, पाऊसकर आणि फर्नांडिस यांची पक्षाला सोडचिठ्ठी
गोवा निवडणुकीत भाजपला खिंडार पडल्याचे चित्र आहे. दीपक पाऊसकर (Deepak Pauskar) व ईझींतोर फर्नांडिस यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.