ETV Bharat / city

पी. चिदंबरम यांची गोवा काँग्रेसच्या वरिष्ठ निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती - पी चिदंबरम गोवा काँग्रेस वरिष्ठ निवडणूक प्रभारी

मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 17 आमदार निवडून आले होते. सत्तास्थापनेसाठी 21च्या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना चार आमदारांची गरज होती. मात्र, त्यावेळी नेतृत्त्वाकडून वेळीच कोणतीही हालचाल झाली नाही.

p chidambaram
पी. चिदंबरम
author img

By

Published : Aug 10, 2021, 9:17 AM IST

पणजी (गोवा) - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची राज्याच्या वरिष्ठ निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता राज्य काँग्रेस निवडणुका लढविणार आहेत. म्हादई नदीच्या ज्वलंत विषयावरून विद्यमान राज्य प्रभारी पी. गुंडू राव यांना हटविण्यात आले आहे. राव हे कर्नाटक राज्यातील असून विधानसभा निवडणुकीत म्हादईचा कर्नाटक-गोवा वाद पेटणार असल्याचे चित्र आहे. तर यावरूनच हा बदल करण्यात आला आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. वेणूगोपाल यांनी तसे नियुक्तीचे पत्र चिदम्बरम यांना दिले आहे.

letter
नियुक्तीचे पत्र
2017 ला भाजपाने तोंडचा घास पळविला होता -

मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 17 आमदार निवडून आले होते. सत्तास्थापनेसाठी 21च्या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना चार आमदारांची गरज होती. मात्र, त्यावेळी नेतृत्त्वाकडून वेळीच कोणतीही हालचाल झाली नाही. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली वेळीच सूत्र हालवत गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्र गोमंतक पक्ष व अपक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन करण्यात आली होती. यावेळी माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या हातात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे देण्यात आली होती. यातूनच सावध पवित्रा घेऊन काँग्रेसने पी. चिदंबरम यांच्या नेतृत्त्वाखाली भविष्यात रणनीती राखण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज..

पी. गुंडू राव यांना हटविले -

राज्यात सध्या म्हादई नदीच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे. हा वाद कर्नाटक आणि विशेषतः गोवा राज्यातील पाणीवाटप मुद्यावरून आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. राज्यात, केंद्रात आणि कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. म्हणून येत्या निवडणुकीत म्हादईच्या पाणीवाटपचा मुद्दा काँग्रेसकडून तापविला जाणार आहे. त्याआधीच कर्नाटकच्या पी. गुंडू राव यांना राज्याच्या निवडणूक प्रभारी पदावरून हटविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.