ETV Bharat / city

गोव्यातील प्रमोद सावंत सरकारचा खाते विस्तार, अपक्ष आमदारांचा हिरमोड

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर भाजपने मार्च महिन्याच्या अखेरीस आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला होता. दरम्यान यावेळी भाजपच्या आठ मंत्र्यानी शपथ घेतली होती. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी आज सकाळी राजभवन येथील राज दरबार हॉलमध्ये संपन्न झाला. भाजपला पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण, मंत्रीपद मिळावे या आशेने भाजपला पाठिंबा देणाऱ्या तीनही अपक्ष आमदारांना कोणतेही मंत्रीपद मिळालेले नाही.

मंत्रीमंडळ विस्तार
मंत्रीमंडळ विस्तार
author img

By

Published : Apr 9, 2022, 3:53 PM IST

पणजी (गोवा) - विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर भाजपने मार्च महिन्याच्या अखेरीस आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला होता. दरम्यान, यावेळी भाजपच्या आठ मंत्र्याने शपथ घेतली होती. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी (दि. 9 एप्रिल) सकाळी राजभवन येथील राज दरबार हॉलमध्ये संपन्न झाला. मात्र, अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

गोव्यातील प्रमोद सावंत सरकारचा खाते विस्तार

मंत्रिमंडळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला स्थान - मंत्रिमंडळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांना स्थान देण्यात आला आहे. ढवळीकर यांच्यासोबत भाजपचे नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, सुभाष फळदेसाई तसेच नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपला पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांचा मंत्री होण्याचे स्वप्न तूर्तास तरी भंगल्याचा दिसून येते. भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे. या तीनही अपक्ष आमदारांना भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.

हेही वाचा - Nilesh Cabral On Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल परवडत नसेल तर इलेक्ट्रिक गाड्या घ्या -निलेश काब्राल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.