पणजी (गोवा) -गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी (Utpal parrikar revolt)भाजपला मोठा धक्का दिला असून त्यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Assembly Election 2022) उत्पलपाठोपाठ माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनीही बंडाचा पावित्रा घेतल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर करताच अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट न मिळाल्याने आपली वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
उत्पल पर्रिकर आणि पार्सेकर अपक्ष लढवणार -
पणजीतून भाजपतर्फे उमेदवारी न मिळाल्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत उत्पल परिकर यांनी आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होताच पर्रिकर यांनी काँग्रेसतर्फे तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी महापौर उदय माडकाईकर यांची शनिवारी दुपारी भेट घेऊन आपणास पाठिंबा देण्याची मागणी केली. दरम्यान पर्रिकर यांच्या मागणीला माडकाईकर यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर पार्सेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Goa Assembly Election 2022 : उत्पलचे बंड शमविण्यात भाजपा अयशस्वी.. 'बंडोबां'मुळे पक्षाची डोकेदुखी वाढली
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी (Utpal parrikar revolt)भाजपला मोठा धक्का दिला असून त्यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Assembly Election 2022) उत्पलपाठोपाठ माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनीही बंडाचा पावित्रा घेतल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.