ETV Bharat / city

गोव्यात भाजपला धक्का, मित्रपक्ष 'मगो'चा लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा

सरकारमध्ये मित्र पक्ष म्हणून असताना भाजपने केलेला वार कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यात भाजपला धक्का
author img

By

Published : Apr 12, 2019, 11:07 AM IST

पणजी - मित्रपक्षाने केलेला वार मगोच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मगोचे कार्यकर्ते लोकसभा प्रचारासाठी आजपासून उघडपणे काँग्रेसचा प्रचार करणार आहेत, असे मगोचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सावंत म्हणाले, सरकारमध्ये मित्र पक्ष म्हणून असताना भाजपने केलेला वार कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण भविष्यात मगो पक्ष विस्तारसाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. हा निर्णय केवळ एका रात्रीत घेतला गेलेला नाही. यासाठी मगोचे छोटे-मोठे नेते कार्यकर्ते, गट समिती आणि हितचिंतक यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा मगो कार्यकर्ते आजपासून उघडपणे प्रचार करणार आहेत.
गोव्यात लोकसभेच्या दोन जागांबरोबरच विधानसभेच्या तीन जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यात आम्ही काँग्रेसला लोकसभेसाठी पाठिंबा देत आहोत. तर विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघात मगो उमेदवार आहे. म्हापसा जागेसाठी मगो गट समितीने यापूर्वी काँग्रेस उमेवाराला पाठिंबा दिला आहे. तर मांद्रे जागेचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असे सावंत यांनी सांगितले.

सावंत पुढे म्हणाले की, मगोची लढाई पक्ष बदलू विरोधात आहे. मागील २० वर्षात गोव्यातील जनतेने पक्ष का बदलले जातात हे पाहिले आहे. मगोचे कार्यकर्ते कमी आहेत, पण असलेले निष्ठावंत आहेत. त्यामुळे समितीने घेतलेला निर्णय पाळला जातो. शिवाय मगोने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. तेव्हा उत्तर गोव्यात ४० हजार तर दक्षिण गोव्यात ७० हजार मते मिळवली होती. राज्य विधानसभा निवडणुकीत १३ टक्के मते मगोला मिळाली आहे. त्यामुळे मगोची ताकद काय हे सर्वांनाच माहिती आहे.

मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केली.त्यानंतर मगोचे दोन आमदार भाजपला जाऊन मिळाले. त्यामुळे मगो नेते सुदीन ढवळीकर यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मगोमध्ये भाजपविरोधात खदखद निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपचा बदला घेण्यासाठी काँग्रेसला उघडपणे पाठिंबा दिला जात आहे.

Intro:पणजी : मित्रपक्षाने केलेला वार मगोच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने काँग्रेस उमेवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मगोचे कार्यकर्ते लोकसभा प्रचारासाठी आजपासून उघडपणे काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

Body:मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारीणीची आज येथील मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सावंत म्हणाले की, सरकारमध्ये मित्र पक्ष म्हणून असताना भाजपने केलेला वार कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण भविष्यात मगो पक्ष विस्तारसाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. हा निर्णय केवळ एका रात्रीत घेतला गेलेला नाही. यासाठी मगोचे छोटे-मोठे नेते कार्यकर्ते, गट समिती आणि हितचिंतक यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा मगो कार्यकर्ते आजपासून उघडपणे प्रचार करणार आहेत.
गोव्यात लोकसभेच्या दोन जागांबरोबरच विधानसभेच्या तीन जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यात आम्ही काँग्रेसला लोकसभेसाठी पाठिंबा देत आहोत. तर विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघात मगो उमेदवार आहे. म्हापसा जागेसाठी मगो गट समितीने यापूर्वी काँग्रेस उमेवाराला पाठिंबा दिला आहे. तर मांद्रे जागेचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत जाहि केला जाईल, असे सावंत यांनी सांगितले.
सावंत पुढे म्हणाले की, मगोची लढाई पक्ष बदलूविरोधात आहे. मागील २० वर्षात गोव्यातील जनतेने पक्ष का बदलले जातात हे पाहिले आहे. मगोचे कार्यकर्ते कमी आहेत, पण असलेले निष्ठावंत आहेत. त्यामुळे समितीने घेतलेला निर्णय पाळला जातो. शिवाय मगोने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. तेव्हा उत्तर गोव्यात ४० हजार तर दक्षिण गोव्यात ७० हजार मते मिळवली होती. राज्य विधानसभा निवडणुकीत १३ टक्के मते मगोला मिळाली आहे. त्यामुळे मगोची ताकद काय हे सर्वांनाच माहिती आहे.
मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केली.त्यानंतर मगोचे दोन आमदार भाजपला जाऊन मिळाले. त्यामुळे मगो नेते सुदिन ढवळीकर यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मगोमध्ये भाजपविरोधात खदखद निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपचा बदला घेण्यासाठी काँग्रेसला उघडपणे पाठिंबा दिला जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.