पणजी - 'जनता कर्फ्यु'ला रविवारी गोव्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानंतरही पंतप्रधान नरेद्र मोदींनी एकमेकांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवावे आणि गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. गोव्यामध्ये जनता कर्फ्यू अजून तीन दिवसांनी वाढवला असल्याची माहिती गोवा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
हेही वाचा - माओवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 17 जवान हुतात्मा
राणे म्हणाले, गोवा सरकार केंद्र सरकारच्या मदतीने आवश्यक उपाययोजना अंमलात आणत आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधानांनी ही साखळी तोडण्यासाठी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला गोव्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. अशा वेळी या विषाणूचा बिमोड करण्यासाठी लोकांचेही सहकार्य आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात सरकारला आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यास वेळ मिळेल. मुख्यमंत्र्यांनी याला मंजुरी दिली असून, लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे.