पणजी - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) कोणत्याही क्षणी गोव्यात दाखल होऊ राज्यपाल ही श्रीधरण पिल्लई यांची भेट ( Governor Sridharan Pillai ) घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानिमित्ताने गोव्यात विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्तही ( Police escort airport in Goa ) वाढविण्यात आला आहे.
विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुढच्या सर्व बाबी सुलभ पार पडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गोवा दौऱ्यासाठी ( Eknath Shinde visit to Goa ) पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.