ETV Bharat / city

Goa Election 2022: 'टीएमसी'ने 'गृहलक्ष्मी' ही हमी उत्पन्न आधार योजनेचा केला शुभारंभ

तृणमूल काँग्रेसने निवडणुकीतील आपल्या पहिल्या महत्त्वाच्या आश्वासनांची घोषणा करून, आज 'गृहलक्ष्मी' ही हमी मिळकत आधार योजना जाहीर केली. ज्यामध्ये गोव्यातील प्रत्येक घरातील एका महिलेला पाच हजार रुपये प्रति महिना हस्तांतरित केले जाणार आहेत.

न
author img

By

Published : Dec 11, 2021, 11:58 PM IST

Updated : Dec 12, 2021, 6:59 AM IST

गोवा - तृणमूल काँग्रेसने ( TMC ) निवडणुकीतील ( Goa Election 2022 ) आपल्या पहिल्या महत्त्वाच्या आश्वासनांची घोषणा करून, शनिवारी (12) 'गृहलक्ष्मी' ही हमी मिळकत आधार योजना जाहीर केली. ज्यामध्ये गोव्यातील प्रत्येक घरातील एका महिलेला 5 हजार रुपये प्रति महिना म्हणजेत वार्षिक साठ हजार रुपयेत हस्तांतरित केले जाणार आहेत, असे म्हणत 'गृहलक्ष्मी' योजनेचा शुभारंभ तृणमुल काँग्रेच्या खासदार तथा गोवा प्रभारी महुआ मोईत्रा, यांनी केला.

'टीएमसी'ने 'गृहलक्ष्मी' ही हमी उत्पन्न आधार योजनेचा केला शुभारंभ

यावेळी किरण कांदोळकर, यतीश नाईक, जोर्सन फर्नांडिस, एथेल लोबो,अविता बांदोडकर आणि इतर अनेक गोवा 'टीएमसी' नेते यांच्या उपस्थित होते. 'गृहलक्ष्मी' योजनेचा शुभारंभ दोनपावला येथील आंतरराष्ट्रीय केंद्र-गोवा येथे शनिवारी (दि. 11) करण्यात आला.

योजनेचा महिलांना थेट लाभ- मोईत्रा

'आम्ही महिलांच्या हातात पैसे ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण जेव्हा पैसे थेट महिलांकडे जातात तेव्हा तो वेगाने अर्थव्यवस्थेत परत येतात.' गृहलक्ष्मी योजनेसाठी सरकारला अंदाजे पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. जे राज्याच्या अर्थसंकल्पच्या फक्त 6-8 टक्के आहे, त्यामुळे ते शक्य असल्याचे माहुआ मोईत्रा यांनी सांगितले.

विकासाची ब्लु प्रिंट तयार - यतीश नाईक

'या योजनेची अंमलबजावणी करण्यायोग्य 'ब्लू प्रिंट' आहे. महागाईशी लढा देण्यासाठी हा धोरणात्मक स्तरावरील कल्याणकारी हस्तक्षेप आहे. 'गृहलक्ष्मी' योजना हा तुमचा हक्क असल्याचे गोवा 'टीएमसी' नेते यतीश नाईक म्हणाले.

हे ही वाचा - Panaji Assembly Election 2022 : राजधानी पणजी जिंकण्यासाठी भाजपातच चुरस; 'अशी' आहे मतदारसंघाची स्थिती

Last Updated : Dec 12, 2021, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.