पणजी (गोवा) - विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होत असले तरी यंदा प्रथमच 80 वर्षावरील 20 टक्के मतदारांनी आपले मतदान पूर्ण केले असून 11 टक्के दिव्यांग आणि विशेष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
80 वर्षावरील ज्येष्ठांचे 20 टक्के मतदान पूर्ण - निवडणूक अधिकारी
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बाजवावा यासाठी यंदा प्रथमच केंद्रीय निवडणूक आयोगाने 80 वर्षावरील जे मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाही. त्यांच्यासाठी घरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. किंवा ते पोस्टाच्या साहाय्याने आपले मतदान करू शकतात, अशी माहिती अतिरिक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली आहे. राज्यात 80 वर्षावरील 29 हजार 281 मतदार आहेत. त्यापैकी त्यापैकी 25 हजार 636 मतदार पोस्टल बँलेट पेपर किंवा त्यांच्या घरी मतदान करण्यास पात्र आहेत. यापैकी 20.75 टक्के म्हणजेच 5320 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्यात 9565 दिव्याअंग विशेष मतदार आहेत. यापैकी 8459 मतदार पोस्टल बँलेट पेपर किंवा घरी मतदान करण्यासाठी पात्र आहेत. यापैकी 924 मतदारांनी म्हणजेच 11 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
11 कोटींचा मुद्देमाल जप्त -
आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत विविध खात्याच्या वतीने आणि भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत मुद्देमाल, दारू, अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये 6 कोटी 31 लाख रोख रुपये, तर 3 कोटी 19 लाख रुपयांची दारू याशिवाय 1 कोटी 27 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.