म्हापसा - गुरुवारी कॅलनगुट समुद्रकिनारी म्हापसा येथे राहणाऱ्या सिद्धी नाईक या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात शवविच्छेदन अहवालानुसार सिद्धीचा मृत्यू समुद्रात बुडून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, घटनास्थळी अर्धनग्न अवस्थेत मिळालेल्या मृतदेहामुळे पोलिसांच्या तपासावर सर्व स्तरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबद्दल आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना विचारणा केली असता या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून, याबाबद्दल काही धागेदोरे मिळाल्यास त्याविषयी पुढच्या दिशेने तपास करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा - धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी