मुंबई - आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांत शिवसेनेने रणसिंग फुंकले. भाजपला शह देण्यासाठी पाचही राज्यात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा राज्यात शिवसेनेच्या प्रचाराचा प्रभाव पडू शकतो. मात्र त्याचे मतपेटीतून परिवर्तन होईल का? याबाबत सांशकता आहे, असे मत राजकीय विश्लेषण श्रीराम पचिंद्रे यांनी व्यक्त केले.
भाजपाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अवघ्या 72 तासात फडणवीसांचं सरकार पाडून महा विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवण्यात आले. काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले नारायण राणे, विखे पाटील, बबनराव पाचपुते आदी मंडळींच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांचा महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर दबाव टाकण्यात आला. परंतु सरकारने केंद्र शासनाला न जुमानता दोन वर्षाचा कालखंड पूर्ण केला. तसेच भाजपचे मनसुबे उधळून लावले आहेत. आता आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपला नेस्तनाबूत करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. येत्या निवडणुका त्याचे परिणाम दिसतील का, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे. कोकंणी आणि मराठी माणसाचा वास्तव्य आहे. शिवसेनेने येथे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही शिवसेना भाजप विरोधात उमेदवार देणार आहे. लवकरच येथे शिवसेनेच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. आघाडीचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, नितीन बानगुडे - पाटील, दिवाकर रावते यांच्या सारख्या नेत्यांची फौज प्रचारात उतरतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या कामाची प्रत्येक क्षेत्राने दखल घेतली आहे. न्यायालय नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली आहे. इतर राज्यात ही जादू चालेल का? याबाबत मात्र शंका आहे.
गोव्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे वर्चस्व आहे. मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला भाजपने तिकीट नाकारून नाराजी ओढवून घेतली आहे. शिवसेनेने या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी पर्रीकर यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला मोठा जनाधार नाही. भाजपला स्थानिक प्रादेशिक पक्ष गोमंतक रोखू शकतो. परंतु त्यांच्यात उभी फूट पडल्याने पक्षात दुफळी आहे. शिवसेनेने हा जनाधार आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपच्या वर्मावर बोट ठेवले जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्यासारखी तोफ या निवडणुकीत धडाडेल. आदित्य ठाकरेंची संयमी नेतृत्व पक्षाला येथे दिशा दाखवेल. युवा तरुणवर्ग आदित्य ठाकरे यांचे फॅन आहेत. परंतु, मतपरिवर्तन किती होईल हे सांगणे मात्र कठीण आहे असे मत राजकीय विश्लेषक श्रीराम पचिंद्रे यांनी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केले.
उत्तर प्रदेश आणि शिवसेना
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि भाजपची हवा आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. येथेही शिवसेना उमेदवार देणार आहे. येथील मतदार सेनेच्या झोळीत मतांचा जोगवा टाकणार का, हा देखील प्रश्न विचारात घेतला जाईल काअसे मत व्यक्त केले जात आहे.