ETV Bharat / city

गोवा : आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंकडून आरोग्य केंद्राची पाहणी

गोवा राज्यातील सर्व रुग्णयातील बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रविवारी (दि. 10 मे) काही आरोग्यकेंद्रांची पाहणी केली.

author img

By

Published : May 11, 2020, 12:42 PM IST

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

पणजी - राज्य कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व रुग्णयातील बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रविवारी (दि.10मे) काही आरोग्यकेंद्रांची पाहणी करत यंत्रणेचा आढावा घेतला.

उत्तर गोव्यातील कांदोळी आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर राणे यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे. त्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणे पुरविण्यात येतील. त्याबरोबरच तापाची तपासणी करण्यात येणारा बाह्यरुग्ण विभाग, फार्मसी साठा यांचा आढावा घेतला. तसेच येणाऱ्या लोकांना योग्य पध्दतीने बसण्याच्या सुविधेची पाहणी केली. कळंगुट येथील आमदार मायकल लोबो यांच्या सहकार्याने येथील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
यावेळी आरोग्यमंत्री राणे यांच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉ. नाझरीत उपस्थित होते.

हेही वाचा - गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात आढळला ब्लॅक पॅन्थर, मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.