ETV Bharat / city

विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या वाहनांवर कारवाईची युवक काँग्रेसची मागणी - students access to buses

गोव्यातील खाजगी प्रवाशी गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्यातिकिटावर प्रवास करण्याची सुविधा दिली जाते. मात्र सध्या तिकीटाचा दर अर्धा आकारला जात असल्याने काही वाहनचालक विद्यार्थ्यांना गाडीत घेत नसल्याच्या घटना घडत आहेत.

युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर
author img

By

Published : Nov 16, 2019, 4:34 AM IST

पणजी - गोव्यातील खाजगी प्रवाशी गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्यातिकिटावर प्रवास करण्याची सुविधा दिली जाते. मात्र सध्या तिकीटाचा दर अर्धा आकारला जात असल्याने काही वाहनचालक विद्यार्थ्यांना गाडीत घेत नसल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी आज गोवा प्रदेश युवक काँग्रेसने सहाय्यक वाहतूक संचालक यांच्याकडे केली.

मागील अनेक महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सुविधा टाळली जात आहे. यासाठी काही बसवाहक पूर्ण बस प्रवाशांनी भरल्यानंतर केवळ चार-पाच विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बसची वाट पाहत रस्त्यावर उभे रहावे लागते, अशी माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हार्दोळकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या वाहनचालकाचा कंडक्टर बँच निलंबित करावा आणि बसचा सदर मार्ग बंद करावा. मुलांना आपल्या तक्रारी अथवा सूचना मांडण्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या गोवा प्रदेश युवक काँग्रेसने केल्या आहेत.

युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, एनएसयुआय प्रदेश अध्यक्ष एराज मुल्ला, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन भंडारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सहाय्यक संचालकांना घेराव घातला. त्यानंतर सहाय्यक संचालक फ्रान्सिस वाज यांनी पणजीच्या मध्यवर्ती कदंब बस स्थानकात जाऊन पाहणी केली.

Intro:पणजी : अनेकांनी केलेल्या संघर्षानंतर गोव्यातील खाजगी प्रवाशी गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्यातिकिटावर प्रवास करण्याची सुविधा मिळाली. परंतु, अलिकडे तिकीटाचा आकार अर्धा आकारला जात असल्याने काही वाहनचालक विद्यार्थ्यांना गाडीत घेत नाही. त्यामुळे अशांवर कारवाई करावी अशी मागणी करत आज गोवा प्रदेश युवक काँग्रेसने सहाय्यक वाहतूक संचालक यांना घेराव घातला.

Body:युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, एनएसयुआय प्रदेश अध्यक्ष एराज मुल्ला, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन भंडारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सहाय्याक संचालकांना घेराव घालत आपल्या मागणीकडे तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली. त्याला सहाय्यक संचालक फ्रान्सिस वाज यांनी प्रतिसाद देत पणजीच्या मध्यवर्ती कदंब बस स्थानकात जाऊन पाहणी केली.
आंदोलनाविषयी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हार्दोळकर म्हणाले, मागील अनेक महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सुविधा टाळली जात आहे. यासाठी काही बसवाहक पूर्ण बस प्रवाशांनी भरल्यानंतर केवळ चार-पाच विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देतात तोही उभ्याने प्रवास. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बसचीक्षवाट पाहत रस्त्यावर तिष्ठत उभे रहावे लागते. यासाठी आज आम्ही वाहतूक संचालकांना घेराव घालत आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यामध्ये लक्ष घातले आहे.
विद्यार्थ्यांशी अशा प्रकारचे गैरवर्तन करत बसमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या वाहनचालकाचा कंडक्टर बँच निलंबित करावा आणि बसला सदर मार्ग बंद करावा. यावर देखरेख ठेवण्यासाठी जर अधिकारी नियुक्त केला असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तसेच मुलांना आपल्या तक्रारी अथवा सूचना मांडण्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत, असेही म्हार्दोळकर यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.