ETV Bharat / city

उत्तर प्रदेशच्या तोतया मंत्र्यांला जामीन मिळण्याआधी खर्च वसूल करावा; काँग्रेसची मागणी - प्रतिमा कुतिन्हो

उत्तरप्रदेश सरकारमध्ये मंत्री असल्याचे सांगून गोवा सरकारचा शाही पाहुणचार घेणाऱ्या संजयकुमार सिंह अटक करण्यात आली होती. त्याची जामीनावर सुटका होण्यापूर्वी सरकारने केलेला खर्च वसूल करावा, अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे.

goa women congress
उत्तर प्रदेशच्या तोतया मंत्र्यांला जामीन मिळण्याआधी खर्च वसूल करावा; काँग्रेसची मागणी
author img

By

Published : Jan 13, 2020, 3:11 PM IST

पणजी - उत्तरप्रदेश सरकारमध्ये मंत्री असल्याचे सांगून गोवा सरकारचा शाही पाहुणचार घेणाऱ्या संजयकुमार सिंह अटक करण्यात आली होती. त्याची जामीनावर सुटका होण्यापूर्वी सरकारने केलेला खर्च वसूल करावा, अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे. तसेच गोवा सरकारने या प्रकरणी जनतेची माफी मागावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या तोतया मंत्र्यांला जामीन मिळण्याआधी खर्च वसूल करावा; काँग्रेसची मागणी

पणजीतील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजपला लक्ष्य केले. कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता गोवा सरकार एका तोतयाला केवळ तो उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील मंत्री असल्याचे सांगितल्याने 12 दिवस पाहुणचार केला. तसेच दिमतीला सरकारी गाडी आणि सुरक्षा रक्षक पुरवले. याचा सर्व खर्च सरकारने वसूल करावा, अशी मागणी महिला काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे.

या प्रकारावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सरकारवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप कुतिन्हो यांनी केला. तसेच ज्या ईमेलच्या आधारे त्याला सरकारी पाहुणचार देण्यात आला, तो ई-मेल उत्तर प्रदेशमधून कोणी पाठवला, याची देखील चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर फसववणुकीचा गुन्हा दाखल करून यापूर्वी देखील असा प्रकार घडला आहे का, याचा उलगडा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व प्रकारावर राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी आत्मपरीक्षण करावे आणि जनतेची माफी मागावी, असे त्या म्हणाल्या.

याच प्रकारची अन्य एक घटना सरकारच्या क्रीडा प्राधिकरण भांडार कक्षात घडल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा नातलग असल्याचे सांगून अमर पर्रीकर नामक व्यक्तीने 19 किट्स नेले आहेत. त्याची वसुली क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांच्याकडून करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

काय आहे प्रकरण ?

एका तोतयाने उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असल्याचे सांगून सरकारी पाहुणचार घेतला. गोवा सरकारने या व्यक्तीच्या सेवेसाठी सरकारी यंत्रणा पुरवली. तसेच सरकारी खर्चातून सुरक्षा देखील पुरवण्यात आली.
उत्तर प्रदेश सरकारने 10 कोटींची आर्थिक मदत देणार असल्याचे आश्वासन त्याने दिले. यानंतर त्याला सरकारी खर्चाने कार्यक्रमातही नेण्यात आले. परंतु, त्याने जेव्हा दारूच्या नशेत घडलेला प्रकार कथन केला. तेव्हा तो तोतया असल्याचे उघड झाले.

Intro:पणजी : उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असल्याचे सांगून गोवा सरकारचा शाही पाहुणचार घेणाऱ्या संजयकुमार सिंह अटकेतआहे. त्याची जामीनावर सुटका होण्यापूर्वी सरकारने केलेला खर्च वसूल करावा. तसेच गोवा सरकारने या प्रकरणी जनतेची माफी मागावी, अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे।

Body:पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारची खातर जमा न करता गोवा सरकार एका तोतयाला केवळ तो उत्तर प्रदेश भाजप सरकारमधील मंत्री असल्याचे सांगत असल्यामुळे गोवा सरकारने 12 दिवस त्याच्यावर सरकारी पैसा खर्च केला. तसेच दिमतीला सरकारी गाडी आणि सुरक्षा रक्षक पुरविले. पण त्यांना तो तोतया आहे, असे वाटले नाही. उलट 10 कोटींची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्याला सरकारी खर्चाने कार्यक्रमातही घेऊन गेले. परंतु, त्याने जेव्हा दारूच्या नशेत घडलेला प्रकार कथन केला. तेव्हा तो तोतया असल्याचे उघड झाले.
या प्रकारावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सरकारवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते, असे सांगून कुतिन्हो म्हणाल्या, ज्या ईमेलच्या आधारे त्याला सरकारी पाहुणचार देण्यात आला तो ईमेल उत्तर प्रदेशमधून कोणी पाठवला होता याची चौकशी करावी. त्याच्यावर फसववणुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच अशा प्रकारे यापूर्वी कोणावर खर्च केलेला आहे का याचीही चौकशी करावी. या सर्व प्रकारावर राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी आत्मपरीक्षण करावे आणि जनतेची माफी मागावी.
कुतिन्हो म्हणाल्या की, अन्य एक प्रकार सरकारच्या क्रीडा प्राधिकरण भांडार कक्षात घडला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा नातलग असल्याचे सांगून अमर पर्रीकर नामक व्यक्तीने 19 किटस् नेली आहेत. त्याची वसुली क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांच्याकडून करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
केवळ भाजप कार्यकर्ता आहे, असे सांगून होत आहे, त्यामुळे यामध्ये घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.