ETV Bharat / city

पणजी पोटनिवडणूक : गोसुमं-काँग्रेसमध्येच थेट लढत - वेलिंगकर - meeting

काही प्रभागात भाजपासाठी काम करणाऱ्या ख्रिश्चन मतदारांनी आम्हला बोलावून बैठक घेत पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच आम आदमी पक्षाकडून भ्रमनिरास झालेले ख्रिश्चन मतदारही गोसुमंचे स्वागत करत आहेत.

गोसुमं-काँग्रेसमध्येच थेट लढत - वेलिंगकर
author img

By

Published : May 17, 2019, 11:10 PM IST

पणजी - भाजपचा पणजी पोटनिवडणुकीतील उमेदवार हा भ्रष्टाचाराने बरबटला आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली म्हणून मते मागावी लागली. त्यांच्या उमेवाराची लोकप्रियता घटत असून पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत खरी लढत गोवा सुरक्षा मंच आणि काँग्रेस यांच्यामध्ये आहे, आम्ही ही लढत जिंकणार, असा दावा गोसुमं पक्षाचे नेते तथा उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

गोसुमं-काँग्रेसमध्येच थेट लढत - वेलिंगकर

वेलिंगकर म्हणाले, आम्ही भाजपची पारंपरिक मते ओढूच त्याबरोबरच काँग्रेसचीही मते खेचून घेणार, प्रचारादरम्यान आम्हाला सर्व स्तरातील लोकांचा चांगला पाठिंबा लाभत असून लोक उत्स्फूर्त स्वागत करत आहेत. गोसुमंला मिळणारा पाठिंबा पाहून भाजपला धक्का बसला आहे. काही प्रभागात भाजपासाठी काम करणाऱ्या ख्रिश्चन मतदारांनी आम्हला बोलावून बैठक घेत पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच आम आदमी पक्षाकडून भ्रमनिरास झालेले ख्रिश्चन मतदारही गोसुमंचे स्वागत करत आहेत.

भाजपवर चारित्र्य हननाचा आरोप
भारतीय भाषा सुरक्षा मंचचा चेहरा म्हणून जेव्हापासून काम करण्याला सुरुवात केली, तेव्हापासून भाजपकडून विविध प्रकारे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सांगून वेलिंगकर म्हणाले, माझ्यावर आरोप अथवा कुटुंबातील सदस्यांची सतावणू केल्यामुळे माझे कार्य थांबत नाही, हे दिसू लागल्यामुळे निनावी पत्रके वाटून माझ्यासह कुटुंबातील महिलांची बदनामी करण्यात येत आहेत. यामागे भाजपच आहे, असा आमचा दावा आहे. कारण भविष्यात भाजपची स्थिती केविलवाणी होणार असल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत.
दरम्यान, चारित्र्य हनन करणारे पत्रक कोणी काढले याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी गोसुमं अध्यक्ष आत्माराम गांवकर, गोविंद देव, किरण नाईक, नीलेश फळदेसाई, परेश रायकर आदींसह गोसुमं पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:पणजी : भाजपचा पणजी पोटनिवडणुकीतील उमेदवार हा भ्रष्टाचाराने बरबटला आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली म्हणून मते मागावी लागली. त्यांच्या उमेवाराची लोकप्रियता घटत असून पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत खरी लढत गोवा सुरक्षा मंच आणि काँग्रेस यांच्यामध्ये आहे आणि आम्ही ही लढत जिंकणार, असा दावा गोसुमं पक्षनेते तथा उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

Body:पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, आम्ही भाजपची पारंपरिक मते ओढूच त्याबरोबरच काँग्रेसचीही मते खेचून घेणार. प्रचारादरम्यान आम्हाला सर्व स्तरातील लोकांचा चांगला पाठिंबा लाभत असून लोक उत्स्फूर्त स्वागत करत आहेत. गोसुमंला मिळणारा पाठिंबा पाहून भाजपला धक्का बसला आहे. काही प्रभागात भाजपासाठी काम करणाऱ्या ख्रिश्चन मतदारांनी आम्हला बोलावून बैठक घेत पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच आम आदमी पक्षाकडून भ्रमनिरास झालेले ख्रिश्चन मतदारही गोसुमंचे स्वागत करत आहेत.
भाजपवर चारित्र्य हननाचा आरोप
भारतीय भाषा सुरक्षा मंचचा चेहरा म्हणून जेव्हा पासुन काम करण्याला सुरुवात केली, तेव्हापासून भाजपकडून विविध प्रकारे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सांगून वेलिंगकर म्हणाले, माझ्यावर आरोप अथवा कुटुंबातील सदस्यांची सतावणू केल्यामुळे माझे कार्य थांबत नाही, हे दिसू लागल्यामुळे निनावी पत्रके वाटुन माझ्यासह कुटुंबातील महिलांची बदनामी करण्यात येत आहेत. यामागे भाजपच आहे, असा आमचा दावा आहे. कारण भविष्यात भाजपची स्थिती केविलवाणी होणार असल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत.
दरम्यान, चारित्र्य हनन करणारे पत्रक कोणी काढले याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी गोसुमं अध्यक्ष आत्माराम गांवकर, गोविंद देव, किरण नाईक, नीलेश फळदेसाई, परेश रायकर आदींसह गोसुमं पदाधिकारी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.