पणजी (गोवा) - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हटले की, राज्य वन विभाग जंगलात पाच लाख फळे देणारी झाडे लावेल. तसेच, मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले की, ते वन्य प्राण्यांसाठी जंगलात शंभर नवीन जल संस्था तयार करणार. मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - बंगळुरूमध्ये डिलीव्हरी बॉयने तरुणीच्या पाठीवर थाप मारत काढली छेड
मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न
सावंत पुढे म्हणाले की, मानव-प्राणी संघर्षामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने खास योजना सुरू केली आहे. राज्य सरकारची जंगलात पाण्याची साखळी वाढवणे आणि फळे देणाऱ्या झाडांची संख्या वाढवणे ही मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याच्या पुढाकाराचा एक भाग आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले होते की राज्य सरकार मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी काम करत आहे.
वनक्षेत्रात १०० नवीन जल संस्था तयार करण्याचा निर्णय
आम्ही वनक्षेत्रात १०० नवीन जल संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, तर पाच लाखांहून अधिक फळे देणारी झाडे लावण्यात येतील. २५० तरुणांना जंगलांच्या समृद्ध जैव विविधतेबद्दल माहिती देण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे. राज्य सरकार जंगलांविषयी जनजागृती करण्यासाठी पक्षी महोत्सव, टर्टल कार्यक्रम आणि इतर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. जैवविविधता उद्यानातून इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यात आले आहे, तर हार्लेम (उत्तर गोवा) आणि धारबंदोरा (दक्षिण गोवा) येथे नवीन नर्सरी देखील सुरू केल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवत यांच्या टि्वटर हॅण्डलवरील ब्लू टिक हटवली