ETV Bharat / city

...अन्यथा गोव्याची बाजू पडणार लंगडी - राजेंद्र केरकर

कर्नाटक सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या कळसा-भांडूरा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने कर्नाटकला दिलेले पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत सांगितले होते. यामुळे गोव्याचे हित कात्रीत सापडेल. याला गोवा सरकारने न्याय दिला नाहीतर गोव्याची बाजू लंगडी पडेल, असे मत पर्यावरण अभ्यासक आणि म्हादई चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे.

राजेंद्र केरकर
author img

By

Published : Oct 27, 2019, 9:43 AM IST

पणजी - येथील कळसा-भांडूरा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने कर्नाटकला दिलेले पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र जर मागे घेतले नाही. तर, गोवा सरकारने राष्ट्रीय हरित लवादकडे जाणे आवश्यक आहे. कारण यावरील सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर, त्याचवेळी कर्नाटक राज्य कामाला सुरुवात करेल आणि त्यामुळे गोव्याचे हित कात्रीत सापडेल. याला गोवा सरकारने न्याय दिला नाहीतर गोव्याची बाजू लंगडी पडेल, असे मत पर्यावरण अभ्यासक आणि म्हादई चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

राजेंद्र केरकर

23 ऑक्टोबरला केंद्र सरकारने कर्नाटकला कळसा-भांडूरा प्रकल्पासाठी पर्यावरण ना हरकत पत्र दिल्याचे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत सांगितले होते. त्याबरोबरच केंद्रीय खाणमंत्री तथा धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्या पाठपुराव्यामुळे देत आहे, असेही त्यांनी म्हटले होते. यावरुन गोव्याच्या राजकीय वातावरणात संतपाची लाट असळली आहे. त्यामुळे म्हादई पाणीवापट विवाद काय आहे, हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी केरकर यांची त्यांच्या राहत्या घरी केरी-सत्तरी येथे भेट घेतली.

यावेळी माहिती देताना केरकर म्हणाले, हा विवाद सुमारे पाव शतकापासून सुरू आहे. परंतु, 2 ऑक्टोबर 2006 ला कर्नाटकचे तत्कालीन उपमुख्यमंत्री (विद्यमान मुख्यमंत्री) येडीयुरप्पा यांनी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे कळसाभांडूरा प्रकल्पाचे भूमीपूजन केले. तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता कालवा खोदकाम सुरू केले. यामुळे सध्यस्थितीत 5 किमी पर्यंत नदी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. 1972 च्या अभयारण्य कायद्यानुसार अभयारण्याच्या दिशेने येणारा नैसर्गिक प्रवाह अडविता येणार नाही, असे असतानाही कर्नाटक काम करत आहे. त्यामुळे गोवा सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यावर चर्चा होऊन म्हादई जल लवादाची स्थापना करण्यात आली. या लवादाने 2010 मध्ये निवाडा दिला होता. ज्यामध्ये गोव्याच्या वाट्याला 26 टीएमसी पाणी आले आहे.

हेही वाचा - 'आयर्नमॅन' हे नाव ऐकताच का उडतो स्पर्धकांचा थरकाप, वाचा...

गोव्यात असलेल्या 12 नद्यांमध्ये म्हादई ( मांडवी) आणि जुवारी या 2 मोठ्या नद्या आहेत. त्यामधील म्हादई नदी गोड्यापाण्याची सर्वात मोठी नदी असून ती गोव्यातील 6 तालुक्यातील 1580 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते, 43 टक्के लोकांना पिण्याचे पाणी देते. असे सांगून केरकर म्हणाले, कर्नाटकच्या अशा वागणुकीविरोधात गोव्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर सुनावणी होणार आहे. अशावेळी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने 2006 मध्ये दिलेले पर्यावरण मुल्यांकन लागू होत नाही. तसेच हा वाद महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक मध्ये असताना कर्नाकट पेयजल प्रकल्पाचे नाटक करत प्रकल्प पुढे रेटणार आहे. कळसा-भांडूरा पाणी कर्नाटक मलप्रभा नदीत वळवू पाहत आहे. ज्यामुळे तेथून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबळी, धारवाड आणि कुंदगोळ शहरांना पाणी पुरवठा करणार आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास हा द्राविडी प्राणायाम आहे.

हेही वाचा - जीएसटीची परिषदेच्या मागील बैठकीकरिता 'उधळपट्टी', गोवा सरकारचे ३.२६ कोटी खर्च

भविष्यात गोव्यात येणारे पर्यटक आणि स्थानिकांसाठी पाणी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. असे सांगून केरकर म्हणाले, म्हादई आश्वासक जलस्रोत होता. परंतु, तिचे पाणी कळसा-भांडूरा आणि हलतरा या दिशेने वळविण्यात येत आहे. त्यानंतर कर्नाटक बैल, कीर्ती, अंधेरा, पानशीरा या नद्या वळविण्याचा प्रस्ताव आहे. तर, दूधसागर धबधब्यासाठी आवश्यक असलेल्या किटला आणि पाळणा नदी पात्रे काळीगंगा नदीत वळविण्यात येतील. या नदीपात्रात खालच्या भागात 3 अभयारण्ये तर 1 राष्ट्रीय अभयारण्य आहे.

गोव्यातील राजकारण्यांबाबत केरकर यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्ती केली. लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गरज आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - गोव्यात बुधवारपासून एकवेळ वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी

Intro:पणजी : कळसाभांडूरा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने कर्नाटकला केंद्र सरकारने दिलेले पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र जर मागे घेतले नाही तर गोवा सरकारने राष्ट्रीय हरित लवादाकडे जाणे आवश्यक आहे. कारण यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आता होणार आहे. तर त्याचवेळी कर्नाटक कामाला सुरुवात करेल. त्यामुळे गोव्याचे हीत कात्रीत सापडेल. याला गोवा सरकारने न्याय दिला नाहीतर गोव्याची बाजू लंगडी पडेल, असे मत पर्यावरण अभ्यासक आणि म्हादई चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

Body:दि. 23 ऑक्टोबरला केंद्र सरकारने कर्नाटकला कळसाभांडूरा प्रकल्पासाठी पर्यावरण ना हरकत पत्र दिल्याचे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत सांगितले होते. त्याबरोबरच केंद्रीय खाणमंत्री तथा धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्या पाठपुराव्यामुळे देत आहे, अहेही म्हटले होते. त्यामुळे यावर गोव्याच्या राजकीय वातावरणात संतपाची लाट असळली आहे. त्यामुळे म्हादई पाणीवापट विवाद काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आज केरकर यांची त्यांच्या राहत्या घरी केरी-सत्तरी येथे भेट घेतली.
यावेळी माहिती देताना केरकर म्हणाले, हा सुमारे पाव शतकापासून विवाद सुरू आहे. परंतु, 2 ऑक्टोबर 2006 रोजी कर्नाटकचे तत्कालीन उपमुख्यमंत्री (विद्यमान मुख्यमंत्री) येडीयुरप्पा यांनी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे कळसाभांडूरा प्रकल्पाचे भुमीपूजन केले. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता कालवा खोदकाम सुरु केले. यामुळे सध्यस्थितीत पाचकिलोमिटर पर्यंत नदी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. 1972 च्या अभयारण्य कायद्यानुसार अभयारण्याच्या दिशेने येणारा नैसर्गिक प्रवाह अडविता येणार नाही असे असतानाही कर्नाटक काम करत आहे. त्यामुळे गोवा सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यावर चर्चा होऊन म्हादई जललवादाची स्थापना करण्यात आली. या लवादाने 2010 मध्ये निवाडा दिला होता. ज्यामध्ये गोव्याच्या वाट्याला 26 टीएमसी पाणी आले आहे.
गोव्यात असलेल्या 12 नद्यामध्ये म्हादई ( मांडवी) आणि जुवारी या दोन मोठ्या नद्या आहेत. त्यामधील म्हादई नदी गोड्यापाण्याची सर्वात मोठी नदी असून ती गोव्यातील सहा तालुक्यातील 1580 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. तर 43 टक्के लोकांना पिण्याणे पाणी देते, असे सांगून केरकर म्हणाले, कर्नाटकच्या अशा वागणुकीविरोधात गोव्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. अशावेळी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने 2006 मध्ये दिलेले पर्यावरण मुल्यांकन लागू होत नाही. तसेच हा वाद महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक मध्ये असताना कर्नाकटने पेयजल प्रकल्पाचे नाटक करत प्रकल्प पुढे रेटणार आहे. कळसाभांडूरा पाणी कर्नाटक मलप्रभा नदीत वळवू पाहत आहे. ज्यामुळे तेथून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबळी, धारवाड आणि कुंदगोळ शहरांना पाणी पुरवठा करणार आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास हा द्राविडी प्राणायाम आहे.
भविष्यात गोव्यात येणारे पर्यटक आणि स्थानिकांसाठी पाणी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे, असे सांगून केरकर म्हणाले, म्हादई आश्वासक जलस्रोत होता. परंतु, तिचे पाणी कळसाभांडूरा आणि हलतरा या दिशेने वळविण्यात येत आहे. त्यानंतर कर्नाटक बैल, कीर्ती, अंधेरा, पानशीरा या नद्या वळविण्याचा प्रस्ताव आहे. तर दूधसागर धबधब्यासाठी आवश्यक असलेल्या किटला आणि पाळणा नदी पात्रे काळीगंगा नदीत वळविण्यात येतील.या नदीपात्रात खालच्या भाडात तीन अभयारण्ये तर एक राष्ट्रीय अभयारण्य आहे.
गोव्यातील राजकारण्यांबाबत केरकर यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करतांना व्यक्ती केली. लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गरज आहे, असेही ते म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.