ETV Bharat / city

'नाफ्ता घोटाळ्याची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे चौकशी व्हावी'

गोव्याच्या समुद्रात अडकलेल्या नू शी नलीनी जहाजातील नाफ्ताचे स्थलांतरणामध्ये मोठा घोटाळा असल्याचे आरोप करत गोवा काँग्रेसने याची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे करावी, अशी मागणी केली आहे.

author img

By

Published : Jan 2, 2020, 9:11 AM IST

Updated : Jan 2, 2020, 10:14 AM IST

बोलताना संकल्प आमोणकर
बोलताना संकल्प आमोणकर

पणजी - गोव्याच्या समुद्रात अडकलेल्या नू शी नलीनी जहाजातील नाफ्ताचे स्थलांतरण हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे करावी. तसेच चौकशी काळात मुरगावचे आमदार तथा शहर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रीमंडळातून वगळावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी (दि. 1 जाने) केली आहे.

बोलताना संकल्प आमोणकर

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले, दोनापवाल समुद्रात भरकटून अडकलेल्या नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता रिकामा करून तो गणेश बेंजोप्लास्ट जहाजात स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतर घाईगडबडीत निविदा काढून तो मुंबईतील कंपनीला विकून संयुक्त अरब अमिरातीकडे रवाना करण्यात आला. यासाठी पूर्वी काढलेली आणि ज्यासाठी 5 कोटींची बोली लागली होती अशी निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आली. ज्याची पायभूत किंमत केवळ 36 लाख रूपये ठेवण्यात आली. आज ज्या कंपनीने हा नाफ्ता खरेदी केला. त्यांनी केवळ 36 लाखांचीच बोली लावली होती. त्यामुळे या कंपनीला पायाभूत किंमत कळाली कशी हा प्रश्न निर्माण होते. परंतु, यामागे स्थानिक आमदार तथा शहर विकास मंत्री मिलिंद नाईक यांचा हात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना मंत्रिमंडळातून वगळून याची चौकशी करावी. कारण निविदा जाहीर होण्यापूर्वी मंत्री नाईक त्या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन आले होते.

मुरगांव पोर्ट ट्रस्टने त्या जहाजात 2 हजार 500 मेट्रीक टन नाफ्ता असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्याची जर 36 लाख रूपयांना विक्री झाली असेल तर प्रतिलिटर केवळ 1 रूपये 50 पैसे किंमत करण्यात आली, असे आमोणकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, या सर्वांचा विचार करता विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ जेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांन भेटले होते, तेव्हा त्यांनी हे जहाज येथपर्यंत येण्यास जबाबदार सर्वांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या शब्दाला जागत एमपीटी चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करावे तसेच सहभागी संबंधितांवर कारवाई करावी. तसेच याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकरवी करावी. मात्र, लोकांची दिशाभूल करू नये. तसेच नू शी नलिनी जहाज तोडण्यामध्येही भ्रष्टाचार होणार असल्याची शंका आमोणकर यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेस प्रवक्ते जनार्दन भंडारी, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, उर्फान मुल्ला आदी उपस्थित होते.

हेही वाचा - अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी मंत्र्यांची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

Intro:पणजी : गोव्याच्या समुद्रात अडकलेल्या नू शी नलीनी जहाजातील नाफ्ताचे स्थलांतरण हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे करावी. तसेच चौकशी काळात मुरगावचे आमदार तथा शहर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रीमंडळातून वगळावे, अशी मागणी काँग्रेसने आज केले आहे.

Body:पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले, दोनापवाल समुद्रात भरकटून अडकलेल्या नू शी नलिनी जहातील नाफ्ता रिकामा करून तो गणेश बेंजोप्लास्ट जहाजात स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतर घाईगडबडीत निविदा काढून तो मुंबईतील कंपनीला विकून संयुक्त अरब अमिरातीकडे रवाना करण्यात आला. यासाठी पूर्वी काढलेली आणि ज्यासाठी पाच कोटींची बोली लागली होती अशी निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आली. ज्याची पायभूत किंमत केवळ 36 लाख रूपये ठेवण्यात आली. आज ज्या कंपनीने हा नाफ्ता खरेदी केला. त्यांनी केवळ 36 लाखांच्या च बोली लावली होती. त्यामुळे या कंपनीला पायाभूत किंमत कळाली अशी हा प्रश्न निर्माण होते. परंतु, यामागे स्थानिक आमदार तथा शहर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच हात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना मंत्रिमंडळातून वगळून याची चौकशी करावी. कारण निविदा जाहीर होण्यापूर्वी मंत्री नाईक सदर कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन आले होते.
मुरगांव पोर्ट ट्रस्टने सदर जहाजात 2500 मेट्रिक टन नाफ्ता असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्याची जर 36 लाख रूपयांना विक्री झाली असेल तर प्रतिलिटर केवळ 1 रूपया 50 पैसे किंमत करण्यात आली, असे सांगून आमोणकर म्हणाले, या सर्वांचा विचार करता विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ जेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांन भेटले होते तेव्हा त्यांनी हे जहाज येथपर्यंत येण्यास जबाबदार सर्वांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या शब्दाला जागत एमपीटी चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल कराव तसेच सहभागी संबंधितांवर कारवाई करावी. तसेच याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकरवी करावी. मात्र, लोकांची दिशाभूल करू नये. तसेच नू शी नलिनी जहाज तोडण्यामध्येही भ्रष्टाचार होणार असल्याची शंका आमोणकर यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेस प्रवक्ते जनार्दन भंडारी, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, उर्फान मुल्ला आदी उपस्थित होते.

Conclusion:
Last Updated : Jan 2, 2020, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.