ETV Bharat / city

गोवा काँग्रेसमध्ये फूट, भाजप प्रविष्ट १० आमदार अमित शाहांची भेट घेणार - 10 congress mla

दिल्लीतील भेटीनंतर ते गोव्यात परतणार असून त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल आणि शपथविधी होणार आहे.

गोवा काँग्रेसमध्ये फूट
author img

By

Published : Jul 11, 2019, 2:58 PM IST

पणजी - काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांचा गट आज दिल्लीत भाजप वरिष्ठांची भेट घेणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर सोबत असून गोव्यात परतल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल आणि शपथविधी होणार आहे.

बुधवारी संध्याकाळी नाट्यमय घडामोडीत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या ९ आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दोन तृतीयांश आमदार फुटल्याने पक्षांतर बंदी कायदा बाजूला पडला. हा गट भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी बुधवारी रात्रीच दिल्लीला रवाना झाला होता. तेथे आज ते गृहमंत्री अमित शाह, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सोबत गोवा भाजप संघटनमंत्री सतीश धोंड असल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्लीतील भेटीनंतर ते गोव्यात परतणार असून त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल आणि शपथविधी होणार आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू कवळेकर यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाचे मंत्री काढून घेतले जाईल आणि घटकपक्षांकडे किती मंत्रिपदे राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. गोवा विधानसभेतील ४० आमदारांपैकी २७ आमदार आता भाजपचे झाले आहेत. तर, घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे ३, अपक्ष ३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष १, काँग्रेसचे ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आमदार असे संख्याबळ झाले आहे.

Intro:पणजी : काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 10 आमदारांचा गट आज दिल्लीत दाखल होत भाजप वरिष्ठांची भेट घेणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर सोबत असून गोव्यात परतल्यानंतर मंत्रीमंडळात फेरबदल आणि शपथविधी होणार आहे.

Body:बुधवारी संध्याकाळी नाट्यमय घडामोडीत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या 9 आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दोनतृतीयांश आमदार फुटल्याने पक्षांतर बंदी कायदा बाजूला पडला. हा गट भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी बुधवारी रात्रीच दिल्लीला रवाना झाला होता. तेथे आज ते ग्रूहमंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सोबत गोवा भाजप संघटनमंत्री सतीश धोंड असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्लीतील भेटीनंतर ते गोव्यात परतणार असून त्यानंतर मंत्रीमंडळ फेरबदल आणि शपथविधी सोहळा होणार आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू कवळेकर यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाचे मंत्री काढून घेतले जाईल आणि घटकपक्षांकडे किती मंत्रीपदे राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. गोवा विधानसभेतील 40 आमदारांपैकी 27 आमदार आता भाजपाचे झाले आहेत. तर घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे 3, अपक्ष तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 1, काँग्रेसचे 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 आमदार असे संख्याबळ झाले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.