ETV Bharat / city

कोणत्याही गुंतवणूकदाराचे गोव्यासह देशात स्वागतच - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - डॉ. केमिची होरिकोशी

गोव्यासह देशभरात गुंतवणूकदारांना सुरक्षित वातावरण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच मागील आठवड्यात सरकारने वस्तू आणि सेवा करातही बदल केल्याचे त्यांनी म्हटले.

परिषदेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Sep 28, 2019, 8:01 PM IST

पणजी - उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकार तयार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वागत असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते एशियन सिव्हिल इंजिनिअरिंग को-ऑर्डिनेटिंग काउन्सिलच्या (एसेक) कार्यक्रमात बोलत होते.

गोव्यासह देशभरात गुंतवणूकदारांना सुरक्षित वातावरण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच मागील आठवड्यात सरकारने वस्तू आणि सेवा करातही बदल केल्याचे त्यांनी म्हटले.

एसेक परिषद

गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, स्थापत्य अभियंत्यांसमोर मोठी आव्हाने आहेत. नव्या कल्पना घेवून पुढे जाण्यासाठी अशा परिषदांची गरज आहे. हा कार्यक्रम पणजीतील कला अकादमीच्या सभागृहात होणार होता. परंतु, काही अडचणींमुळे होवू शकलेला नाही. सध्या कला अकादमीसमोर असलेली अडचण दूर करण्यासाठी या परिषदेचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एसेकच्या कार्यपद्धती विषयी माहिती देताना सरचिटणीस डॉ. केमिची होरिकोशी म्हणाले, एसेक हे जगभरातील बांधकाम क्षेत्रातील अभियंत्याचे संघटन आहे. यामध्ये ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान यांची एकमेकांना माहिती दिली जाते. विकसित देशांबरोबरच विकसनशील देशांतील अभियंत्यांचा संघटनेत समावेश आहे. उज्वल भविष्य आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी संघटनेमध्ये विचार करण्यात येतो. सुरुवातीला ३ देशांचा सहभाग असलेल्या या संघटनेमध्ये १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

एसेकच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्ताने इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स इंडियाने कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला डॉ. आर. एम. वासन, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स इंडियाचे अध्यक्ष एस. एल. स्वामी आणि एसेकचे संस्थापक सदस्य डॉ. ओसामू कोसाकबे आदी उपस्थित होते. तसेच परिषदेला जगभरातील १४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Intro:पणजी : गोव्यासह देशभरात गुंतवणूकदारांना सुरक्षित वातावरण आहे. मागील आठवड्यात सरकारने वस्तू आणि सेवा करातही काही बदल केले आहेत. उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सरकार पुरविण्यास तयार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वागत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केले.

Body:एशियन सिव्हिल इंजिनिअरिंग को-ऑर्डिनेटिंग कौन्सिल (एसेक)च्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्ताने इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स इंडियाने आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, एसेकचे सरचिटणीस केमिची होरिकोशी, डॉ. आर. एम. वासन, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स इंडियाचे अध्यक्ष एस. एल. स्वामी आणि एसेकचे संस्थापक सदस्य डॉ. ओसामू कोसाकबे आदी उपस्थित होते.
एसेकच्या कार्यपद्धती विषयी माहिती देताना सरचिटणीस डॉ. केमिची होरिकोशी म्हणाले, एसेक हे जगभरातील बांधाकाम क्षेत्रातील अभियंत्याचे संघटन आहे. ज्यामध्ये ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान यांची एकमेकांना माहिती दिली जाते. विकसित देशांबरोबरच विकसनशील देशांतील अभियंत्यांचा समावेश आहे. जे उज्वल भविष्य आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी काय करता येईल यावर विचारविमर्ष करत असतात. सुरुवातीला 3 देशांचा सहभाग असलेल्या या संघटनेमध्ये आता 14 देशांचा समावेश आहे. युवा अभियंत्यांसाठी हा उपक्रम लाभदायक आहे तसेच महिला अभियंत्यांनाही यापुढे सहभागी करून घेतले जाणार आहे. तंत्रज्ञानाचा उपयुक्त वापर कसा करावा यावरही यामध्ये चर्चा होत असते.
तर गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, स्थापत्य अभियंत्यांसमोर मोठी आव्हाने आहेत. कशा वेळी नव्या कल्पना घेऊन पुढे जाण्यासाठी अशा परिषदांची गरज आहे. हा कार्यक्रम पणजीतील कला अकादमीच्या सभागृहात होणार होता. परंतु, काही अडचणींमुळे हैऊ शकलेला नाही. सध्या कला अकादमीसमोर असलेली अडचण दूर करण्यासाठी या परिषदेचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या परिषदेत जगभारातील 14 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.