पणजी - केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन, शिक्षण, महिलांविषयक तरतुदींबरोबरच 'सागरमित्रा' सारख्या योजनांची तरतूद करण्यात आली आहे. याचा गोव्यासाठी अधिकाधिक फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सावंत यांनी आल्तिनो येथील 'महालक्ष्मी' निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
हेही वाचा - एलआयसीमधील सरकारी हिस्सा विकणार - केंद्रीय अर्थमंत्री
डॉ. सावंत म्हणाले, करामध्ये देण्यात आलेल्या सुटीचा मध्यमवर्गीयांना लाभ होणार आहे. तसेच पंचायतराज आणि ग्रामीण विकासासाठी करण्यात आलेल्या दोन लाख कोटींची तरतुद ग्रामपंचायतींसाठी उपयोगी आहे. तर आरोग्यविषयक तरतुदीमुळे सरकारी-खासगी भागादारीतून वैद्यकीय महाविद्यालय उभारता येणार आहे.
अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली डाटासेंट्रीक पार्क तरतूद गोव्याला लाभदायक आहे, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, या नव्या स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देण्यात आले त्यामुळे सामान्यांना व गरीबांना दूरगामी लाभ कसा होईल, याचा विचार करुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर या अर्थसंकल्पाला नजरेसमोर ठेवून गोवा सरकारचा अर्थसंकल्प मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - अर्थसंकल्पाचे उद्योग जगताकडून स्वागत, पुण्यातील मराठा चेंबर्समधील तज्ञांच्या प्रतिक्रिया