गोवा - गोवा विधानसभा निवडणुकीचे राजकारण ( Goa Assembly Election 2022 ) तापले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ( Former Cm Manohar Parrikar ) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ( Utpal Parrikar On Goa Eletion ) यांचे तिकीट भाजपाने कापले आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपाला रामराम ठोकत अपक्ष लढण्याची घोषणा केली ( Utpal Parrikar Independent Candidate ) आहे. त्यातच आज देशाचे गृहमंत्री अमित शाह गोवा दौऱ्यावर येणार ( Amil Shah Goa Tour ) आहेत. ते उत्पल पर्रीकर यांची मनधारणी करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित शाह एकदिवसीय गोवा दौऱ्यावर ( Amit Shah In Goa ) आहेत. ते दोन जाहीर सभांसह तीन ठिकाणी प्रचारात सहभाग घेतील. त्यांच्या वास्कोतील सभांचे डिजीटल माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. शाह यांच्या गोवा दौऱ्यानिमित्त कोरोना नियमाचे पालन करुन निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल. यानिमित्ताने राज्यांतील विविध भागात स्क्रीन उभारून सभागृह, खुल्या मैदानांत त्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि अन्य नेते गोव्यात सभा घेणार आहेत.
असा असेल अमित शाहांचा गोवा दौरा
- दुपारी 2 वाजता गोव्यात आगमन
- 2.45 ला साईबाबा दर्शन
- 3.30 ला ग्रेस गार्डन फोंडा येथे जाहीर सभा
- संध्याकाळी 5.00 वाजता सावर्डे येथे घरोघरी जाऊन प्रचार
- 5.25 ला शारदा मंदिर हॉल सावर्डे येथे प्रचारसभा
- 7 वाजता अँब्रेला रेल्वे हॉल येथे प्रचारसभा
हेही वाचा - Mann Ki Baat : 'मन की बात'च्या वेळेत बदल, वाचा कधी संबोधित करणार पंतप्रधान मोदी