ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात शिवसेना जोमात, जनाधार कोमात ?

गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात निवडणूक होणार आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. गोवा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात शिवसेना जोरदारपणे उतरणार असल्याचा दावा शिवसेनेकडुन केला जातो आहे. मात्र गोव्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेला मिळालेली मते पाहता गोव्यात शिवसेनेला जनाधार नाही हे स्पष्ट होते.

Goa Assembly Election
Goa Assembly Election
author img

By

Published : Jan 21, 2022, 4:59 PM IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत हे गोव्यात ठाण मांडून आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना गोव्यात अधिक पसंती मिळेल आणि निवडणुकीच्या रिंगणात काहीतरी चमत्कार होईल असा दावा करीत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केलेली आहे. मात्र गोव्यात शिवसेनेला जनाधार नाही हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. गोव्यात मोठ्या संख्येने महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला मानणारे लोक असतानाही शिवसेनेला (Shiv Sena Election campaign in Goa) फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. गोव्यात शिवसेना उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही. इतकच काय पाचशेपेक्षा अधिक मतेही मिळवता आले नाहीत.

हे ही वाचा - BJP Panaji Candidate Atanasio Monserrate : 'मी माझी तुलना मनोहर पर्रीकरांशी करत नाही ते खूप मोठे नेते'

2017 विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची स्थिती -
२०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकी (Goa Assembly Election) शिवसेनेने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. या तीनही उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली होती. तीन उमेदवारांना मिळून ७९२ मते मिळाली होती. म्हणजेच शिवसेनेच्या उमेदवाराला सरासरी २६४ मते मिळाली होती.

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे पानिपत -
२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी शिवसेनेला आणखी वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शिवसेनेने पाच मतदारसंघांमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. या पाचही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. तर पाच उमेदवारांना मिळून २१० मते मिळाली होती. म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला सरासरी ४२ मते मिळाली होती.

हे ही वाचा - NCP Shivsena Allience in Goa Election : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती; उत्पल पर्रिकरांबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

गोव्यात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती मजबूत -
गोव्यात यंदा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून निवडणूक लढवत आहे. शिवसेनेने दहा ते पंधरा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याचा चंग बांधला आहे. मात्र गोव्यात जनाधार नसलेल्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती अधिक मजबूत असल्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.

२०१७ मध्ये राष्ट्रवादीची परिस्थिती -
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १६ जागांवर त्यांना मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाली होती. मात्र, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवता आला राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण २० हजार ९१६ मते मिळाली होती.

२०१२ विधानसभा निवडणुकीतील चित्र -
२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी चार उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवण्यात यशस्वी झाले होते. तर पक्षाला एकूण ३४ हजार ६२७ मते मिळाली होती. मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. या निवडणुकीत काँग्रेसने नऊ जागांवर विजय मिळविला होता. त्यांना २ लाख ६१ हजार मते मिळाली होती.

मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र पालटले असून शिवसेनेला चांगली मते मिळतील तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे गोव्याचा दौरा करणार असून त्यांच्या दौऱ्यानंतर सकारात्मक बदल पाहायला मिळेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.