ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : मार्मुगाव तिसऱ्यांदा भाजप राखणार की, यंदा काँग्रेस धक्का देणार? - मार्मुगाव विधानसभा मतदारसंघ

गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील मार्मुगाव ( Mormugao Assembly constituency) या मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. हा मतदारसंघ भाजप राखणार का? याकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिल आहे. यंदा या मतदारसंघात भाजप आपला गड कायम राखणार की काँग्रेस भाजपला हुलकावणी देणार याचा कौल लवकरच मतपेटीत बंद होणार आहे.

Goa Assembly Election
Goa Assembly Election
author img

By

Published : Jan 21, 2022, 3:17 PM IST

पणजी (गोवा) - गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात निवडणूक होणार आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी (Goa Assembly Election Votting) होणार आहे.उत्तर गोवा जिल्ह्यातील मार्मुगाव ( Mormugao Assembly constituency) या मतदारसंघावर नेहमीच भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. भाजपाने सातत्याने काँग्रेसला पाणी पाजत आपला गड शाबूत राखला आहे.

मार्मुगाव मतदारसंघाची रचना -

मार्मुगाव मतदारसंघात ( Mormugao Assembly constituency) एकूण मतदारांची संख्या साडे एकवीस हजार इतके आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 11 हजार 8 तर महिला मतदारांची संख्या दहा हजार ४३८ इतकी आहे. सुमारे ८० टक्के इतके सर्वसाधारण मतदान होते.

२०१२ विधानसभा निवडणूक -

२०१२ विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मिलिंद सगुण नाईक यांनी काँग्रेसच्या संकल्प अमोनकर यांचा पराभव केला. मिलिंद सगुन नाईक यांना सात हजार ४१९ मते मिळाली तर अमोनकर यांच्या पारड्यात 6 हजार 506 मते पडली.

२०१७ विधानसभा निवडणूक -

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही मिलिंद नाईक यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक साधली. भाजपाच्यावतीने विजय संपादन करताना मिलिंद नाईक यांना ८,४६६ मते मिळाली तर त्यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी संकल्प आमोनकर यांचा पराभव केला अमोनकर यांना 8 हजार ३२६ मते मिळाली. केवळ सव्वाशे मतांनी मिलिंद नाईक यांना निसटता विजय मिळाला.

यंदा या मतदारसंघात भाजप आपला गड कायम राखणार की काँग्रेस भाजपला हुलकावणी देणार याचा कौल लवकरच मतपेटीत बंद होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.